Talegaon Dabhade : सुंदराबाई शेवाळे यांचे निधन

एमपीसी न्यूज : गोवित्री ( ता. मावळ) येथील शेतकरी कुटुंबातील व जुन्या पिढीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुंदराबाई सत्तु शेवाळे यांचे गुरूवार (दि. 16) वृद्धापकाळाने वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले.

त्यांच्या मागे दोन मुले, तीन मुली, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. प्रगतीशील शेतकरी नाथा शेवाळे व आत्माराम शेवाळे यांच्या त्या मातोश्री, तर  मावळ पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय शेवाळे यांच्या त्या आजी होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.