Talegaon Dabhade : श्री स्वामी जयंती उत्सव भक्तिभावात साजरा

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे स्टेशन परिसरात सप्तशृंगी माता मंदिरात माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे मित्र परिवार आणि सिध्दी विनायक प्रतिष्ठान यांच्या वतीने अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग(दिंडोरी प्रणित) स्वामी जयंती उत्सव भक्तीमय वातावरणात साजरा झाला.

दुपारी स्वामी समर्थ मंत्राचे हवन करण्यात आले. स्वामी चरित्र ग्रंथाचे वाचन करण्यात आले. सायंकाळी भव्य पालखी मिरवणूक सोहळा झाला. सप्तशृंगी मंदिर, इंद्रायणी काॅलनी, आनंद नगर, मनोहर नगर, वनश्री नगर, स्वामी समर्थ मंदिर, सिम्को काॅलनी, मोहन नगर व परत सप्तशृंगी मंदिर या परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सर्वात पुढे आकर्षक रथ होता त्यामध्ये स्वामींची वेशभूषा केलेला बालचमु होता. त्या पाठोपाठ ढोल पथक,ढोल ताशा पथक होते. महिलांचे ढोल पथक होते. फटाक्यांची नयनरम्य आतषबाजीमुले मिरवणुकीला शोभा आली होती. मिरवणुकीस व स्वामी दर्शनास भाविकांनी गर्दी केली होती. माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, दै.पुढारी चे पत्रकार जगन्नाथ काळे व सिध्दीविनायक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. सायंकाळी आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.त्याचा अनेक भाविकांनी लाभ घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.