Talegaon Dabhade : स्वामी समर्थ जयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) तळेगाव स्टेशन (Talegaon Dabhade) आणि माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांच्या वतीने गुरुवारी (दि. 23) श्री स्वामी समर्थ जयंती उत्सव साजरा करण्यात आला. या सोहळ्यात स्वामी समर्थ मंत्र हवन, चरित्र ग्रंथाचे वाचन, पालखी सोहळा, मिरवणूक, आरती व महाप्रसाद असा भव्य कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी उद्योजक किरण काकडे, माजी उपनगराध्यक्ष, तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश काकडे, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, मनोहर ढमाले, युवा नेते आशिष खांडगे, दीपक दाभाडे, राजेंद्र दाभाडे आदींसह हजारो भाविक उपस्थित होते.

Pune : महिला सन्मान योजनेचा जिल्ह्यात तीन लाखाहून अधिक महिला प्रवाशांनी घेतला लाभ

इंद्रायणी कॉलनी तळेगाव दाभाडे येथील सप्तशृंगी मंदिरात झालेल्या या उत्सवात पहाटे तीन वाजता श्री स्वामी समर्थ मंत्राचे हवन त्यानंतर श्री स्वामी समर्थ चरित्र ग्रंथाचे वाचन व हवन करण्यात आले. सायंकाळी पाच वाजता स्वामी समर्थ (Talegaon Dabhade) यांची पालखी काढण्यात आली. सप्तशृंगी मंदिर इंद्रायणी कॉलनी येथून निघालेली पालखी आनंदनगर, मनोहर नगर, वनश्रीनगर, स्वामी समर्थ मंदिर, सिम्को कॉलनी, मोहन नगर या मार्गावरून काढण्यात आली. रात्री साडेआठ वाजता आरती व महाप्रसादाने जयंती उत्सवाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.