Talegaon Dabhade : लिलाबाई नवले यांचे निधन

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील वारकरी संप्रदायातील मार्गदर्शक लिलाबाई राघू नवले (वय 84) यांचे बुधवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले.

त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. पंढरपूर पायी वारी करण्यात त्यांचा सहभाग असे. त्यांच्या मागे तीन मुली, दोन मुले, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते उल्हास नवले आणि तळेगाव शहर शिवसेनेचे माजी शहर प्रमुख राजेंद्र नवले यांच्या त्या मातोश्री तर रोहित राजेंद्र नवले यांच्या त्या आजी होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.