Talegaon : आरोग्य तपासणी शिबिरात बचत गट महिलांना मार्गदर्शन

एमपीसी न्यूज – दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि माईर्स एमआयटी पुणेचे एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय तळेगाव दाभाडे यांच्या विद्यमाने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयोजित नगरपरिषद अंतर्गत स्थापित सर्व बचत गटाच्या परिवारासाठी स्वस्थ SHG परिवार आरोग्य शिबिर घेण्यात आले. यावेळी बचत गट महिलांना आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

शहरातील MIMER संस्थेच्या पुष्पलता वसंतलाल मेहता नागरी आरोग्य केंद्र गणपती चौक, तळेगाव येथे आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगरअध्यक्षा चित्रा जगनाडे यांचे हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास तळेगाव दाभाडे नगरपरिषद उप मुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, महिला व बालकल्याण समिती च्या सभापती मा सौ प्राची हेंद्रे, नगरसेविका शोभा भेगडे तसेच महाविद्यालयाचे डॉ दर्पण महेशगौरी डॉ संजीव चिंचोलीकर, डॉ अजित जाधव, डॉ अशोक व्हटकर, डॉ दिलीप भोगे , सामाजिक अभिसरण तांत्रिक तज्ञ दिलीप गायकवाड, विभा वाणी, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या क्षेत्र समन्वयक मीनाक्षी तिकोने व विविध बचतगट महिला, वस्तीस्तर संघ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे व आपण तंदुरुस्त असणे गरजेचे आहे असे नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी यावेळी सांगितले.

आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यासाठी महाविद्यालयाच्या डॉ सुचित्रा नागरे व डॉ. दर्पण महेशगौरी यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. नगरपरिषदेच्या शहर व्यवस्थापन कक्षाचे दिलीप गायकवाड, विभा वाणी मदत केली. स्थानिक व्यवस्थापक डॉ. दांडेकर यांनी पूर्वतयारी व यशस्वीतेसाठी मदत केली. महिला आर्थिक विकास महामंडळ च्या मीनाक्षी तिकोने, दया लायगुडे, झिटे यांनी नोंदणीसाठी मदत केली. सूत्रसंचालन राहुल पारगे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.