Talegaon : ‘शिक्षकांना दिलेले कोविड सर्वेक्षणाचे काम तात्काळ रद्द करा’

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ शाखेची मागणी : Immediate cancellation of Kovid survey work given to teachers'

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यातील शिक्षकांना ऑनलाइन शिक्षण, अभ्यास तपासणे, व्हिडीओ तयार करणे, झूम ॲपवर अभ्यास घेणे अशी अनेक शैक्षणिक कामे असताना देखील महसूल विभाग मावळ व तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने कोविड सर्वेक्षण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यामुळे हे अतिरिक्त काम तातडीने रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

याबाबत परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष भारत काळे, कार्यवाह वशिष्ठ गटकुळ, जिल्हा प्रतिनिधी गणेश पाटील, धनंजय नांगरे, राम कदमबांडे, देवराम पारिठे, भाऊसाहेब खोसे आदी उपस्थित होते.

शासनाने दि.१७ ऑगस्ट रोजी शासन निर्णय काढून शिक्षकांना शैक्षणिक काम असल्याने सर्वेक्षणाचे काम देऊ नये आणि दिले असेल तर ते तात्काळ रद्द करण्यात यावे अशा स्वरूपाचा निर्णय घेतला.

मात्र, तरीही तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने शिक्षकांना दमबाजी करुन हे काम करावेच लागेल; अन्यथा कारवाई केली जाईल, असा दम दिला जात असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी आमदार शेळके यांना सांगितले.

तसेच याबाबत आमदार शेळके आणि तळेगाव नगरपरिषेदेचे मुख्याधिकारी दिपक झिंजाड यांना निवेदन देण्यात आले. शिक्षकांना देण्यात आलेले कोविड सर्व्हेक्षणाचे काम तात्काळ रद्द करण्याची मागणी या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात केली.

दरम्यान, आमदार शेळके यांनी या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे एकूण घेतले. तसेच या प्रश्नी संबंधीत अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून दोन दिवसात शिक्षकांना देण्यात आलेले काम रद्द करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.