Talegaon News : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील लिंब फाटा चौकात उड्डाणपूल उभारण्याच्या मागणीसाठी उपोषण 

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील लिंब फाटा चौकात वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी उड्डाणपूल उभारण्याच्या मागणीसाठी आज (गुरुवारी दि.15) सकाळी नगरसेवक अरुण माने यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात आले.

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते जमीर नालबंद, दिलीप डोळस,जयवंत कदम, महेश महाजन, खंडू टकले, बापू कदम, किशोर कवडे, नवनाथ कुल,दिलीप चौधरी, सुरेश बोऱ्हाडे, माजी नगरसेवक सूर्यकांत काळोखे, नगरसेविका वैशाली दाभाडे, नगरसेवक संतोष भेगडे व बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

या आंदोलनात हातात गदा घेऊन यमाची वेशभूषा परिधान करुन कार्यकर्ता सहभागी झाला होता.

आंदोलन स्थळी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांनी एमएसआरडीसीचे अधिकारी राकेश सोनवणे, आयआरबीचे अधिकारी उत्तम चौघुले यांच्यासोबत चर्चा करुन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसे लेखी पत्र आंदोलकांना दिले.

आंदोलनानंतर आयआरबीच्या वतीने लिंब फाटा चौक येथे वाहतूक सुरळीत होण्यासाठी गतिरोधक तसेच सूचना फलक लावण्याच्या कामाला सुरुवात केली.

लिंब फाटा चौकात उड्डाणपूल करण्याच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.अपघात रोखण्यासाठी चौकात वाहतूक पोलीस नियुक्त करण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी सांगितले.

स्वयंचलित सिग्नल उभारणी प्रस्ताव आयआरबीकडे पाठवणार असल्याचे एमएसआरडीसीचे राकेश सोनवणे यांनी सांगितले. आभार संतोष परदेशी यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.