Hinjawadi Crime News : वेश्या व्यवसायप्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज – महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दलालाला पोलिसांनी अटक केली. ही घटना बुधवारी (दि. 14) हिंजवडी येथे उघडकीस आली.

सुनील बळीराम सरवदे (रा. जय मल्हार नगर, थेरगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याचा साथीदार सनी (पुर्ण नाव, पत्ता माहीत नाही) याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला पोलीस उपनिरीक्षक बोरकर यांनी बुधवारी (दि. 14) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील सरवदे आणि सनी हे दोघेजण महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करीत होते. तसेच त्यांना मिळालेली रक्कम आपसात वाटून त्यावर आपली उपजीविका भागवत असताना मिळून आले.

पोलिसांनी कारवाई करत दोघांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 370 (3), 34, पिटा ॲक्ट कलम 3, 4, 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.