Talegaon News : तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे नवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांचा महिला दक्षता समितीतर्फे सत्कार

एमपीसी न्यूज – शहरातील विविध पदांवर काम करत असलेल्या महिला एकत्रितपणे आवडीने काम करतात. यापुढे समितीला पूर्णपणे सहकार्य राहील, असे आश्वासन महिला दक्षता समितीच्या सत्काराला उत्तर देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिले.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे नवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांचा समितीतर्फे सत्कार करण्यात आला.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून भास्कर जाधव यांची नियुक्ती झाल्याबद्दल महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा वैशाली दाभाडे व सर्व दक्षता समितीच्या सदस्यांच्या वतीने जाधव यांना मास्क डिसइन्फेक्टेड स्प्रे व सॅनिटायझर स्प्रे देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी विविध पक्षातील महिला दक्षता समितीच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यावेळी सर्व सदस्यांची माहिती घेण्यात आली. दक्षता समितीच्या (भरोसा सेल) माध्यमातून कोणती कामे केली जातात व पुढील कामांच्या नियोजन संदर्भात चर्चा करण्यात आली.

महिला डाॅक्टर, प्राध्यापक, निवृत्त न्यायाधीश, समुपदेशक व वकील अशा प्रत्येकीला सदस्य म्हणून समितीत स्थान देणार असून नुसते महिला सबलीकरण व सक्षमीकरणावर भाषणे न देता प्रत्यक्ष कृतीवर भर देणार असल्याचे अध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.