Talegaon News : पर्यटन अनलॉक ! कोरोनात आनंदाच्या संसर्गाला नाही तोटा

एमपीसी न्यूज – कोरोना सारख्या जीवघेण्या संसर्गामुळे सर्वत्र भीतीचे वातवरण निर्माण झालेले सर्वांनी अनुभवले आहे. कडक लॉकडाऊन ते टप्याटप्याने शिथिलता हा बदल देखील जगाने जवळून पाहिला आहे. दीड वर्षापासून फिरण्यावर अनेक बंधन होती, पर्यटनावर बंदी होती. आता कोरोनाचा धोका कायम असला तरी लस उपलब्ध झाली आहे. लसीकरणाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, कोरोना आणि सुरक्षितता याबबात जागृती वाढली आहे. त्यामुळे हळुहळू सर्व गोष्टी पूर्ववत होत आहेत. कोरोनाच्या काळात पर्यटनाला मोठा फटका बसला पण, बंधन शिथिल होत असताना पर्यटन देखील ‘अनलॉक’ होत आहे.

जागतिक पर्यटन दिन साजरा केला जात असताना कोरोनामुळे लावण्यात आलेली पर्यटनावरील बंदी शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडू लागले आहेत. दीपावलीच्या सुट्या आणि कोरोनामुळे अनेक बंधनात काढले दिवसांचा शीण घालवण्यासाठी पर्यटनाचे बेत सुरू झाले आहेत. त्यामुळे अनेक यांत्रा कंपन्या त्यांची विविध पॅकेज तयार केली जात आहेत तसेच, नागरिक आपल्या बजेट नुसार विविध राज्यातील विविध डेस्टिनेशन यांची चाचपणी करत आहेत. कोरोनामुळे जवळपास दोन वर्षापासून नागरिक घरात आहेत, घरात कंटाळलेले नागरिक आता पर्यटनासाठी राज्याबाहेर धाव घेत आहेत.

 

कोरोनाने न्यू नॉर्मल या संकल्पनेची ओळख करून दिली, आता पर्यटनात देखील न्यू नॉर्मल संकल्पना नव्याने रूजत आहे. मास्क, सॅनिटायझर, कोरोना चाचण्या यांचा आता पर्यटन कंपन्यांच्या पॅकेजमध्ये समावेश झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमी लोकांचा ग्रुप करून गर्दी टाळण्यासाठी हटके स्थळांना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे हे बदल स्विकारून पर्यटन अनलॉक झाले आहे. कोरोनाची खबरदारी घेत पर्यटनाला सुरूवात झाली असली तरी आनंदाच्या संसर्गाला अजिबात तोटा नाही असे म्हणता येईल.

तळेगाव मधील एनएमपी ट्रॅव्हल अँड टूर्स प्रा. लि कोरोनाच्या काळात सर्व नियमांचे पालन करून प्रावाशांची सुरक्षितता आणि सहलीची मौजमजा यांची पुरेपुर काळजी घेऊन सहलीचे आयोजन करत आहे. कोरोना काळात देखील कर्नाटक किनारपट्टी, गोवा, वाराणसी, गया, आयोध्या, काश्मिर, लेह, लदाख, तिरूपती या ठिकाणी यशस्वी पद्धीतीने सहलींचे आयोजन केले. 200 हून अधिक पर्यटकांनी याचा स्थळांना ‘एनएमपी’च्या माध्यमातून भेट दिली.

दिपावली सुट्टीत अनेकजण वेगवेगळ्या ठिकाणी भेट देण्याचे बेत करत असतात. एनएमपी ट्रॅव्हल अँड टूर्स कंपनीने गुजरात, अंदमान, कुलूमनाली. केरळ, कश्मिर, उटी, म्हैसूर या ठिकाणी सहलींचे आयोजन केले आहे. थोड्याच दिवसात कंपनीला IATA हे प्रमाणपत्र मिळेल, हे प्रमाणपत्र मिळवणारी मावळमधील ही एकमेव संस्था असेल. ‘बजेट आणि ठिकाण तुम्ही ठरवा, सहलीचे नियोजन आम्ही करू’ असे या कंपनीचे घोषवाक्य आहे. त्यामुळे बजेटची चिंता करण्यापेक्षा आपलं आवडत ठिकाण ठरवा आणि बॅग पॅक करायला घ्या.

संपर्कासाठी पत्ता :
एनएमपी ट्रॅव्हल अँड टूर्स प्रा. लि
बी/2 संस्कृती अपार्टमेंट, तुकाराम नगर, तळेगाव दाभाडे
प्रशांत ठोके – 9860499514

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.