Talegaon News : चौराईदेवी जीर्णोद्धार समितीच्या वतीने चौराईदेवी मंदिर परिसरात वृक्षारोपण

एमपीसी न्यूज – सोमाटणे येथील चौराईदेवी जीर्णोद्धार समितीच्या वतीने वटपौर्णिमेचे औचित्य साधून रविवारी (दि.27) चौराईदेवी मंदिर परिसरात देशी वृक्षांच्या 100 रोपांचे रोपण करण्यात आले.

माजी उपसरपंच राकेश मुऱ्हे म्हणाले वनक्षेत्राच्या हद्दीत ग्लिरिसिडिया नावाच्या वनस्पती मोठ्या प्रमाणात असुन या वनस्पतीमुळे वन्यजीवांना काहीच उपयोग होत नसल्याने मंदिर परिसरात वड, पिंपळ, चिंच व लिंब अशा देशी वृक्षांच्या रोपांचे रोपण केले आहे.

या वृक्षांच्या संरक्षण व संवर्धनासाठी चौराईदेवी जीर्णोद्धार समिती पुढाकार घेणार आहे. या परिसरात जास्तीत जास्त देशी वृक्षांच्या रोपांचे रोपण करुन वन्यजीवांच्या आश्रय व अन्नाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी विकास मुऱ्हे, मच्छिंद्र मुऱ्हे, शैलेश मुऱ्हे, वाल्मिक दिवसे, प्रशांत मुऱ्हे, राजेश मुऱ्हे, काळुराम कुंभार व ग्रामस्थ उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.