Talegaon : तळेगावात दुसऱ्या कोरोनाबळीची नोंद, कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू

Record of second corona Death in Talegaon, death of coronated woman :तळेगावात दुसऱ्या कोरोनाबळीची नोंद, कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू

एमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे येथील डाॅ. भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रूग्णालयाच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या तळेगावातील 50 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा आज, शनिवारी मृत्यू झाला. त्यामुळे तळेगावातील कोरोनाबळींची संख्या दोनवर पोहोचली आहे.

गुरुवारी (दि. 25 जून ) व शुक्रवारी (दि. 26 जून) या महिलेच्या दोन्ही मुलांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला होता.

त्या दोघांच्या निकटच्या संपर्कातील असल्याने त्या महिलेला डाॅ. भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचाही स्वॅब घेण्यात आला. शनिवारी ( दि. 27जून ) या महिलेचा चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला होता. श्वासोच्छ्वास घेण्यात त्रास होत असल्याने गेले सहा दिवस ही महिला व्हेंटिलेटरवर होती.

आज शनिवार (दि. 4 जुलै ) सकाळी 7 च्या दरम्यान या कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला.

आजपर्यंत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीतील कोरोनाबाधितांची संख्या 41 झाली असून यापैकी 13 जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

तर सक्रिय रूग्णांची संख्या 26 आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या दोन झाली आहे. तर मावळ तालुक्यातील मृतांची संख्या सहावर पोहोचली आहे, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तळेगाव दाभाडेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.