Talegaon : भरधाव कारच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जात असलेल्या कारची रस्ता ओलांडणाऱ्या ज्येष्ठ महिलेला धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना 24 मार्च रोजी उर्से ते आढे यादरम्यान शिवतेरा ओढ्याजवळ घडली.

शांताबाई बाळू थोरवे (वय 65, रा. आंबेवाडी ऊर्से, मावळ) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. याप्रकरणी गणेश बाळू थोरवे (वय 28) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किरण बाळू सुतार (वय 23, रा. आढे मावळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 मार्च रोजी आरोपी कारमधून (एमएच 14 / एच क्यू 6239) भरधाव वेगात जात होता. ऊर्से ते आढे या दरम्यान शिवतेरा ओढ्याजवळ मयत शांताबाई थोरवे या पायी रस्ता ओलांडत होत्या. आरोपीच्या भरधाव कारची शांताबाई यांना जोरात धडक बसली. यामध्ये त्यांच्या डोक्याला व हाता पायाला गंभीर दुखापत झाली.

त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत 16 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.