Chichwad : मातृसेवा वृध्दाश्रमास ‘त्यांनी’ केली आर्थिक मदत

एमपीसी न्यूज – मातृसेवा वृध्दाश्रमामध्ये दि. 24 मे रोजी प्राची शितोळे यांचे काका महादेव शितोळे यांचा जन्मदिवस असतो. मात्र, त्यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यांच्या आठवणी जागवण्यासाठी त्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मातृसेवा वृध्दाश्रमास आर्थिक मदत केली.

याविषयी प्राची संस्कृती यांना म्हणाल्या, माझ्या काकांना सामाजिक कार्याची प्रचंड आवड होती. या निमित्ताने प्राची संस्कृती सोबत बोलल्या आणि त्यांच्या आईला त्यांनी सांगितले संस्कृती माझी मैत्रीण आहेत. त्यांच्या वृद्धआश्रमात जाऊ या आणि प्राची त्यांच्या आईला घेऊन मातृसेवा वृध्दाश्रमामध्ये भेट द्यायला आले असता त्यांनी वृध्दाश्रमाला आर्थिक स्वरूपात मदत केली.

  • ती भेट वृध्दाश्रमाचे संस्थापक सुहास गोडसे आणि वृध्दाश्रमाच्या व्यवस्थापिका संस्कृती गोडसे यांनी आनंदाने स्विकारली. व्यवस्थापिका संस्कृती गोडसे यांनी शितोळे कुटुंबाचे आभार मानत पाहुणचार केला. प्राची आईला सांगत असताना म्हणाल्या, संस्कृती यांचे वय लहान असून त्यांना समाजकार्य करण्याची गोडी आहे, तिच कौतुक करावे तेवढे कमी आहे.

प्राची यांच्या आई देखील म्हणाल्या, तुम्ही जी सेवा करत आहात ती सेवा आजची सक्खी मुले आणि सुना देखील करत नाहीत. तुम्ही पैसे दिले तरी हि सेवा आजची पिढी स्वत:च्या आई-बाबाची सेवा ही करणार नाहीत. खूप पुण्याचं काम करत आहात. याचे पुण्य तुला नक्की मिळेल असे कौतुक त्यांच्या आईने केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.