Kalasagar : कलासागर या दिवाळी अंकाचे शुक्रवारी रघुनंदन पणशीकर यांच्या हस्ते प्रकाशन

एमपीसी न्यूज टाटा मोटर्स यांच्या कलासागर दिवाळी अंक 2022 Kalasagar चे प्रकाशन सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक रघुनंदन पणशीकर यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी (दि.14) होणार आहे. हे या दिवाळी अंकाचे यशस्वी 42 वे वर्ष आहे.

Kinara old age home : किनारा वृद्धाश्रमाच्या सदस्यांचा मेट्रोमध्ये वाढदिवस साजरा

हा सोहळा शुक्रवारी पिंपरीतील ट्रेनिंग डिव्हीजन हॉस्टेल कॉन्फरन्स हॉल येथे दुपारी सव्वा तीन वाजता रंगणार आहे हा अंक सुप्रसिद्ध गायक, युएई व जर्मनी मधील टीव्ही चॅनल्सवर आपली कला सादर करणारे, सवाई गंधर्व,एनसीपीसी,स्पीक मॅके, तानसेन महोत्सव अशा अनेक प्रतिष्ठीत प्लॅटफॉर्मवर (Kalasagar) आपली कला सादर करणारे,महाराष्ट्र टाईम्स सन्मान,झी गौरव पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सन्मान, संगीत रत्न,प्रभा आत्रे गौरव पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी गौरविले गेलेले रघुनंदन पणशीकर यांच्याहस्ते प्रकाशीत होणार असल्याने सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी 47 व्या कथा व कविता स्पर्धेचा निकाल जाहीर होणार असून पाहुण्यांच्या हस्ते पारितोषीक वितरणही होणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.