Pimpri : पिंपरी चिंचवडमध्ये ‘ठाकरे’ चित्रपटाचे उत्स्फूर्त स्वागत

नगरसेवक राहुल कलाटे यांच्या हस्ते उपस्थितांना बाळासाहेब ठाकरे यांच्या 'फटकारे' या पुस्तकाचे वाटप

एमपीसी न्यूज- हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित बहुचर्चित ‘ठाकरे’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. हा चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित होत असून पिंपरी चिंचवड शहरात त्याचे मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले आहे. शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी ढोल ताशांच्या गजरात ठाकरे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला उपलब्ध करून दिला.

पिंपळे सौदागर येथील रॉयल सिनेमागृहात राहुल कलाटे यांनी ठाकरे चित्रपटाचे सकाळी अकराचे सर्वच ‘शो’ बुक केले होते. यावेळी शिवसेनेच्या महिला संपर्कप्रमुख वैशाली सूर्यवंशी, नगरसेविका मीनल यादव, रेखा दर्शिले, अश्विनी वाघमारे, नगरसेवक अमित गावडे, सचिन भोसले, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक शाम लांडे, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, शिवसेनेच्या महिला संघटिका उर्मिला काळभोर, वैशाली मराठे, अनिता तुतारे, मोहननगर शिवसेनेचे विभागप्रमुख विशाल यादव, सेनेचे चिंचवड युवा अधिकारी राकेश वाकुर्डे, पत्रकार, चिंचवड विधानसभेतील विविध सोसायट्यांचे पदाधिकारी, दत्त नागरी ज्येष्ठ नागरीक संघाचे सदस्य, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महिलांनी मराठमोळ्या पध्दतीने भगवे फेटे बांधून हजेरी लावली होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांना बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘फटकारे’ या पुस्तकाचे वाटप राहुल कलाटे यांच्या हस्ते करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.