Pimpri : शहरात सरासरी 51.65 टक्के मतदान

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील तीन विधानसभा मतदारसंघात सरासरी 51.65 टक्के मतदान झाले आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघात 51.33 टक्के, चिंचवडमध्ये 53.32 टक्के आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात 52.52 टक्के सरासरी मतदान झाले आहे.  मतदानाची अंतिम आकडेवारी अद्यापपर्यंत आलेली नाही.

पिंपरी-चिंचवड शहतील चिंचवड, भोसरी आणि पिंपरी या तीनही विधानसभा मतदारसंघात आज (सोमवारी) सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली होती. तीनही मतदारसंघात मतदानाला अल्प प्रतिसाद मिळाल्याचे मतदानाच्या सरासरी टक्केवारीवरुन दिसून येत आहे. सायंकाळी सहा वाजता मतदानाची वेळ संपली. परंतु, सहाच्या आतमध्ये मतदान केंद्रात आलेल्या नागरिकांचे रात्री उशिरापर्यंत मतदान सुरु होते. त्यामुळे मतदानाची अंतिम आकडेवारी अद्यापर्यंत समजू शकली नाही.

पिंपरी विधानसभा मतदारसंघात 51.33 टक्के, चिंचवडमध्ये 53.32 टक्के आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात 52.52 टक्के सरासरी मतदान झाले आहे.  दरम्यान, पिंपरी विधानसभा मतदारसंघात 2009 च्या निवडणुकीत 42.52 टक्के आणि 2014 मध्ये 46.23 टक्के मतदान झाले होते. तर, चिंचवडमध्ये 2009 च्या निवडणुकीत 50.53 टक्के आणि 2014 मध्ये 56.30 टक्के मतदान झाले होते. भोसरी मतदारसंघात 2009 च्या निवडणुकीत 48.17 टक्के आणि 2014 च्या निवडणुकीत 60.89 टक्के मतदानाची नोंद आहे.

राज्यात सरासरी 58.75 टक्के मतदान
राज्यात आज विधानसभा निवडणुकीचे मतदान झाले. राज्यात सरासरी 58.75 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. मतदानाची अंतिम टक्केवारी समजू शकली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.