Pune : सर्वसामान्यांना घर देणारी संस्था असा प्राधिकरणाचा नावलौकिक करणार – सदाशिव खाडे

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाचा खाडे यांनी स्वीकारला पदभार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर कामगारांची नगरी असून औद्योगिक शहर म्हणून या नगरीचा नावलौकिक आहे. या नगरीतील कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना झाली. कामगार, सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यासाठी योजना तयार केली जाणार आहे. घर देणारी संस्था अशीच प्राधिकरणाची ओळख निर्माण करणार असल्याचे,  प्राधिकरणाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी (शुक्रवारी) सांगितले. तसेच प्राधिकरणाच्या स्थापनेसाठी अनेक भूमिपुत्रांनी जमिनी दिल्या आहेत. त्यांचा साडे बारा टक्के परताव्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असून भुमिपूत्र आणि कामगार यांच्यात समन्वय साधून कामकाज करणार असल्याची, ग्वाहीही खाडे यांनी दिली. 

 

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची सूत्रे सदाशिव खाडे यांनी शुक्रवारी (दि.7)स्वीकारली. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिशकुमार खडके यांनी पुष्पगुच्छ देऊन खाडे यांचे स्वागत केले. यावेळी खासदार अमर साबळे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, उपमहापौर सचिन चिंचवडे, सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेवक बाबू नायर, माऊली थोरात, केशव घोळवे, नामदेव ढाके, मोरेश्वर शेडगे, अभिषेक बारणे, कैलास बारणे, संदीप कस्पटे, खाडे यांच्या पत्नी संगिता खाडे, माजी उपमहापौर व नगरसेविका शैलजा मोरे, सीमा सावळे,  योगिता नागरगोजे, अश्विनी बोबडे, अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, प्रियंका बारसे, महिला शहराध्यक्ष शैला मोळक, आशा काळे, अमर मुलंचदाणी, विनायक गायवाड, राजू सावंत, यशवंत भोसले, कैलास कुटे, राजेश पिल्ले, अमृत प-हाड, भीमा बोबडे, अमोल थोरात, राजू दुर्गे, अमित गोरखे यांच्यासह भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासोबत माजी महापौर आर.एस.कुमार, योगेश बहल, शिवसेनेच्या सुलभा उबाळे उपस्थित होते.

 

त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना खाडे म्हणाले, स्थानिक खासदार, आमदार, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन यांनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री गिरीश बापट, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी या बाबतीत लक्ष घालून लोकनियुक्त अध्यक्षांची नियुक्ती केली आहे.

 

प्राधिकरणाची स्थापना करताना पिंपरी-चिंचवड या औद्योगिक नगरीतील कामगारांना माफक किमतीत घरे मिळावी असा उद्देश ठेवण्यात आला होता. यासाठी स्थानिक नागरिकांनी त्यांच्या जमीनी दिल्या असून जमिनीच्या मोबदल्यात स्थानिकांना साडेबारा टक्के परतावा देण्यात येणार आहे. 14 वर्ष लोकनियुक्त अध्यक्ष नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना घरे आणि साडेबारा टक्के परतावा हे दोन्ही मुद्दे काही प्रमाणात दुर्लक्षित झाले आहेत.  त्यामुळे आगामी काळात याच दोन मुद्द्यावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे, खाडे यांनी सांगितले.

 

प्राधिकरण प्रशासनाचा मुख्य उद्देश घर मिळवून देने हा आहे, अनेक कारणांमुळे पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाला आपला उद्देश साध्य करण्यात यश मिळाले नाही. त्यामुळे प्राधिकरणाचा मुख्य उद्देश पूर्ण करण्यासाठी घरांची योजना नव्याने राबविण्यात येणार आहे. याद्वारे गरजूंना माफक किमतीत घरे मिळतील याकडे लक्ष दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

 

सर्व प्रश्नांचा अभ्यास करणार आहे. त्यानंतर त्याचा अहवाल करुन येत्या आठवड्यात दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करणार आहे. त्यांच्या माध्यमातून सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी  प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये यश येईल असा विश्वासही खाडे यांनी व्यक्त केला. तसेच राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे मी या पदापर्यंत पोहचू शकलो, अशी कृतज्ञतेची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.