Maharashtra Corona Update: राज्यात कोरोनामुक्तांच्या संख्येने ओलांडला एक लाखाचा टप्पा

एकूण 1 लाख 86 हजार 626 कोरोनाबाधितांपैकी 1 लाख 01 हजार 172 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात आता 77 हजार 260 सक्रिय रुग्ण आहेत.

एमपीसी न्यूज : राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाखाच्या पार झाली असून जुलैच्या सुरूवातीलाच एकाच दिवशी 8 हजार 18 रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे आता बरे झालेल्यांची संख्या 1 लाख 1 हजार 172 झाली आहे. आज सर्वाधिक बरे झालेले रुग्ण मुंबई मंडळातील असून 7 हजार 33 रुग्णांना घरी सोडण्यात आले, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज 6 हजार 330 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 1 लाख 86 हजार 626 अशी झाली आहे. आज नवीन 8 हजार 018 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1 लाख 01 हजार 172 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 77 हजार 260 सक्रिय रुग्ण आहेत.

आज सोडण्यात आलेल्या 8 हजार 18 रुग्णांमध्ये मुंबई मंडळात 7 हजार 33 (आतापर्यंत एकूण 72 हजार 285) तर त्यापाठोपाठ पुणे मंडळात 477 (आतापर्यंत एकूण 14 हजार 315), नाशिक मंडळात 332 (आतापर्यंत एकूण 5602), औरंगाबाद मंडळ 93 (आतापर्यंत एकूण 3214), कोल्हापूर मंडळ 12 (आतापर्यंत एकूण 1556), लातूर मंडळ 7 (आतापर्यंत एकूण 702), अकोला मंडळ 31 (आतापर्यंत एकूण 1964), नागपूर मंडळ 33 (आतापर्यंत एकूण 1534) रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.

दि. 29 मे रोजी राज्यात एकाच दिवशी 8 हजार 381 रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा तेवढ्याच विक्रमी संख्येने रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सातत्याने बरे होणाऱ्या रुग्णांचा आलेख वाढत असून दि. 15 जून रोजी एकाच दिवशी 5 हजार 71, दि.24 जून रोजी 4 हजार 161 आणि दि. 25 जून रोजी 3 हजार 661 रुग्ण बरे होऊन घरी गेले. जूनमध्ये एकाच महिन्यात 12 हजार 893 एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले.

गेल्या काही महिन्यापासून सातत्याने राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे 51 ते 53 टक्क्यांच्या आसपास राहिला आहे. राज्यात सध्या उपचार सुरू असलेल्या एकूण (ॲक्टिव्ह) रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात कोरोनाच्या चाचण्यांनी ओलांडला १० लाखांचा टप्पा

राज्यात सध्या 64 शासकीय आणि 50 खाजगी अशा एकूण 114 प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत असून दर दशलक्ष लोकसंख्येमागे राज्यातील चाचण्यांचे प्रमाण 7,715 एवढे आहे. हे प्रमाण देशपातळीवर 6,334 एवढे आहे. 1 जुलैला देशभरात 90 लाख 56 हजार 173 प्रयोगशाळा चाचण्या झाल्या असून त्यातील 11.26 टक्के चाचण्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 10 लाख 20 हजार 368 नमुन्यांपैकी 1 लाख 86 हजार 626 नमुने पॉझिटिव्ह (18.29 टक्के) आले आहेत.

राज्यात 5 लाख 72 हजार 32 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 41 हजार 741 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील कोरोना मृत्यूदर 4.38 टक्के

राज्यात आज 125 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी 110 मृत्यू मागील 48 तासांमधील तर उर्वरित 15 मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातील मृत्यूदर 4.38 टक्के एवढा आहे.

मागील 48 तासात झालेले 110 मृत्यू हे मुंबई मनपा- 57, ठाणे- 1, ठाणे मनपा-4, जळगाव- 6, नंदूरबार- 1, पुणे- 2, पुणे मनपा- 18, पिंपरी चिंचवड मनपा- 1, सातारा- 2,कोल्हापूर- 1, औरंगाबाद-4, औरंगाबाद मनपा- 9, जालना- 2, लातूर- 1, उस्मानाबाद- 2, नांदेड मनपा- 1, अकोला- 2 या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह  रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (८०,६९९), बरे झालेले रुग्ण- (५०,६९१), मृत्यू- (४६८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टिव्ह  रुग्ण- (२५,३११)

ठाणे: बाधित रुग्ण- (४१,३४९), बरे झालेले रुग्ण- (१६,६६३), मृत्यू- (१०२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह  रुग्ण- (२३,८८०)

पालघर: बाधित रुग्ण- (६४२७), बरे झालेले रुग्ण- (२७९६), मृत्यू- (१११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (३५२०)

रायगड: बाधित रुग्ण- (४८८१), बरे झालेले रुग्ण- (२३५५), मृत्यू- (१०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह  रुग्ण- (२४२२)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (६३०), बरे झालेले रुग्ण- (४४६), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (१५७)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२२१), बरे झालेले रुग्ण- (१५४), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (६२)

पुणे: बाधित रुग्ण- (२४,४३२), बरे झालेले रुग्ण- (११,९८५), मृत्यू- (८०७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (११,६४०)

सातारा:  बाधित रुग्ण- (११७५), बरे झालेले रुग्ण- (७४३), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह  रुग्ण- (३८३)

सांगली: बाधित रुग्ण- (४११), बरे झालेले रुग्ण- (२३४), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (१६६)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (८७४), बरे झालेले रुग्ण- (७२२), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (१४०)

सोलापूर: बाधित रुग्ण- (२६७४), बरे झालेले रुग्ण- (१५८७), मृत्यू- (२६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह  रुग्ण- (८१८)

नाशिक: बाधित रुग्ण- (४५३०), बरे झालेले रुग्ण- (२४५८), मृत्यू- (२२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (१८५०)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (४५०), बरे झालेले रुग्ण- (३०६), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (१३०)

जळगाव: बाधित रुग्ण- (३६४७), बरे झालेले रुग्ण- (२१०८), मृत्यू- (२५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (१२८४)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (१७८), बरे झालेले रुग्ण- (७३), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (९७)

धुळे: बाधित रुग्ण- (११७२), बरे झालेले रुग्ण- (६५७), मृत्यू- (५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह  रुग्ण- (४५७)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (५८४६), बरे झालेले रुग्ण- (२५३७), मृत्यू- (२७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (३०३८)

जालना: बाधित रुग्ण- (६१३), बरे झालेले रुग्ण- (३५५), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (२३९)

बीड: बाधित रुग्ण- (१२१), बरे झालेले रुग्ण- (९५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह  रुग्ण- (२३)

लातूर: बाधित रुग्ण- (३८३), बरे झालेले रुग्ण- (१९९), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (१६५)

परभणी: बाधित रुग्ण- (१०५), बरे झालेले रुग्ण- (७९), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (२२)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२७०), बरे झालेले रुग्ण- (२४३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (२६)

नांदेड: बाधित रुग्ण- (३६४), बरे झालेले रुग्ण (२३४), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (११६)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (२२९), बरे झालेले रुग्ण- (१७४), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (४३)

अमरावती: बाधित रुग्ण- (६११), बरे झालेले रुग्ण- (४२५), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (१५८)

अकोला: बाधित रुग्ण- (१५५९), बरे झालेले रुग्ण- (१०८९), मृत्यू- (८०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह  रुग्ण- (३८९)

वाशिम: बाधित रुग्ण- (१११), बरे झालेले रुग्ण- (७७), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (३१)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (२६३), बरे झालेले रुग्ण- (१५२), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (९८)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (३०९), बरे झालेले रुग्ण- (२२१), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (७८)

नागपूर: बाधित रुग्ण- (१५८२), बरे झालेले रुग्ण- (१२२८), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (३३९)

वर्धा: बाधित रुग्ण- (१६), बरे झालेले रुग्ण- (१२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (३)

भंडारा: बाधित रुग्ण- (८७), बरे झालेले रुग्ण- (७५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (१२)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१४५), बरे झालेले रुग्ण- (१०४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (४०)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (९७), बरे झालेले रुग्ण- (५७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (४०)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (६८), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (९)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (९७), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (७४)

एकूण: बाधित रुग्ण-(१,८६,६२६), बरे झालेले रुग्ण-(१,०१,१७२), मृत्यू- (८१७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१६),ॲक्टिव्ह  रुग्ण-(७७,२६०)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.