Maval Corona Update : मावळ तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा दोन हजार पार; सोमवारी नवीन 38 रुग्ण

The number of corona infected persons in Maval Taluka has crossed the count of 2 thousand, new 38 patients today.

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा दोन हजार पार गेला आहे. तालुक्यात एकूण बाधितांची संख्या 2001 झाली आहे. आज (सोमवारी, दि. 31) कोरोनाचे 38 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर दिवसभरात 11 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सोमवारी तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 17 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 21 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये कामशेत येथील सात, टाकवे, वराळे, कान्हे येथील प्रत्येकी दोन, इंदोरी, सोमाटणे, शिरगाव, साते, ब्राह्मणवाडी (बौर), कशाळ, लोहगड, शिंदगाव येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

तळेगाव शहरात 12, लोणावळा शहरात एक आणि वडगावमध्ये चार रुग्ण आढळले आहेत.

एकूण 2001 रुग्णांमध्ये सध्या 512 रुग्ण सक्रीय आहेत. तर 1 हजार 409 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 80 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 689, लोणावळा नगरपरिषद 247 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 132 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 933 रुग्ण आढळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.