Moshi : पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या तरुणाचा मोबाईल फोन दोन चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना 3 मे रोजी स्पाईन सिटी मॉलसमोर एमआयडीसी भोसरी येथे घडली.

सागर शिवकुमार पाटील (वय 21, रा. गोल्डन पाल्म सोसायटी, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर 3 मे रोजी एमआयडीसी भोसरी येथील स्पाईन सिटी मॉल येथून रस्त्याने पायी चालत जात होते. दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांचा 13 हजार 990 रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.