Petrol Price Today : पेट्रोलच्या दराने ओलांडली नव्वदी

एमपीसी न्यूज :  पेट्रोल petrol डिझेलच्या diesel दरांत rates prices पुन्हा एकदा वाढ झाली आहे.  तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 28 आणि 29 पैशांनी वाढवल्या आहेत. परिणामी बहुतांश शहरांमध्ये दराच्या आकड्यानं नव्वदी ओलांडली आहे.

मुंबईत Mumbai पेट्रोलचे दर 90.05 तर, डिझेल 80.05 रुपये प्रतिलीटर दरानं विकलं जात आहे. पोर्ट ब्लेअर येथे पेट्रोल सर्वाधिक कमी म्हणजेच 70.23 रुपये प्रतिलीटर इतक्या किमतीला मिळत आहे. दरम्यान सातत्यानं होणारी दरवाढ आणि त्यामुळं अनेकांवर येणारा आर्थिक बोजा पाहता काँग्रेसकडून या इंधन दरवाढीत सत्ताधाऱ्यांनी लक्ष देत दरवाढीत दिलासा द्यावा अशी मागणी केल्याचं कळत आहे. जवळपास दोन वर्षांच्या काळात पेट्रोलच्या दरांनी गाठलेला हा उच्चांकी आकडा अनेकांनाच घाम फोडत आहे.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात सरकारकडून हे दर स्थिर ठेवण्यात आले होते. पण, जून महिन्यापासून ही दरवाढ सुरु झाली. पुढं, 22 सप्टेंबरपासून स्थिर असणारी ही दरवाढ 20 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरु झाली. परिणामी दरांचा वाढता आकडा सारी गणितं बदलून गेल्याचं पाहायला मिळालं.

केंद्र सरकारकडून सध्या पेट्राेलवर ३२.९८ रुपये तर डिझेलवर ३१.८३ रुपये उत्पादन शुल्क आकारण्यात येते. तर महाराष्ट्र सरकारकडून पेट्राेल आणि डिझेलवर अनुक्रमे २६ आणि २४ टक्के व्हॅट आकारला जाताे. त्यावर अनुक्रमे १०.२० रुपये आणि ३ रुपये सेसही घेण्यात येताे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.