Bhosari News: सीसीटीव्हीतून उघड झाली कंपनीतील कामगाराची चोरी

एमपीसी न्यूज – कंपनी मालकाने सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता कामगाराने 67 हजारांचे जॉब मटेरियल चोरून नेल्याचे उघडकीस आले. ही घटना 12 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत नवनाथ इंडस्ट्री, शांतीनगर भोसरी येथे घडली.

मच्छिंद्र सखाराम तनपुरे (वय 51 , रा. लांडेवाडी, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवींद्रकुमार मौर्य (रा. भोसरी. मूळ रा. उत्तर प्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shikrapur News: स्थानिक गुन्हे शाखेने दमदार कारवाई करत दुकाने व घरांमध्ये दरोडे टाकणारी टोळी केली जेरबंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रवींद्रकुमार हा फिर्यादी यांच्या कंपनीत कामासाठी आला. त्याने फिर्यादींचा विश्वास संपादन करून कंपनीतून 55 हजार रुपये किमतीचे 187 किलो लोखंडाचे मटेरियल फिर्यादी यांच्या संमतीशिवाय नेले. त्यानंतर फिर्यादींनी आरोपीस कंपनीतील सीसीटीव्ही कॅमेरे दाखविले असता आरोपीने सुरू केलेले लोखंडाचे मटेरियल परत आणून दिले. दरम्यान फिर्यादींनी सीसीटिव्ही फुटेज तपासले असता आरोपीने 67 हजार रुपयांचे लोखंडी मटेरियल जॉब चोरून नेल्याचे उघडकीस आले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.