Pimpri Crime : वरिष्ठांच्या सांगण्यानुसार वाग; अन्यथा खोट्या गुन्ह्यात अडकवू म्हणत महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग

एमपीसी न्यूज – वरिष्ठांच्या सांगण्यानुसार काम करा (Pimpri Crime) नाही, तर तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवू म्हणत महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या बँकेतील क्लर्कवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून बँकेतील क्लर्क मनोज लक्ष्मनदास बक्षाणी (वय 54, रा. साई चौक, पिंपरी) या इसमावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hinjawadi News: फ्लॅटचे लिव्ह अँड लायसन्स रक्कम न देता मागितली सव्वा कोटींची खंडणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे दि. सेवा विकास बँकेतच काम करतात. आरोपीने फिर्यादीला “तुम्ही श्रीचंद आसवानी यांच्या सांगण्या प्रमाणेच काम करा, नाहीतर तुम्हाला (Pimpri Crime) खोट्या गुन्ह्यात अडकवू”, अशी धमकी दिली. तसेच महिलेला त्याच्या ऑफिसमध्ये बोलावून हस्तांदोलन करण्याच्या बहाण्याने त्यांचा हात पकडून त्यांच्या बरोबर अश्लिल चाळे व शेरेबाजी केली. त्याच बरोबर, तु एकदा तरी माझ्या बरोबर फिरायला चल, नाही तर कामावरुन काढून टाकण्याची आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली आहे, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. यावर मनोज याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.