Pimpri : अस्तित्व फौंडेशनतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त नारी शक्तीचा अनोखा सन्मान

एमपीसी न्यूज – नारी शक्तीचा सन्मान आणि अभिमान असणाऱ्या नवरात्र उत्सव आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधत आकुर्डी येथील अस्तित्व फौंडेशनने पिंपरी-चिंचवड महापालिकेची आकुर्डी येथील प्रसूती ग्रहाला भेट देऊन तेथील गरोदर तसेच स्तनदा माता व नवजात शिशूच्या आरोग्य पोषणासाठी शतावरी बेबी किट आणि फळे आदींचे वाटप केले.

याप्रसंगी अरुणा सीलम, सारिका पासळकर, सारिका कुलकर्णी,  शीतल त्रिभुवन, सरिता धीमान, रितू शर्मा, संगीता बेंद्रे, रुपाली ताडे, चेतन बेंद्रे, सुरज बनसोडे, मोहसीन गडकरी, शंकर शिवभक्तन, प्रसाद ताडे, हुसैन रंगवला, स्वप्नील गाढवे, चेतन साबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.