Pune News : पुणे मेट्रोच्या या दोन मार्गावरील कामे पूर्ण, 6 मार्च रोजी पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन

एमपीसी न्यूज : बहुचर्चित पुणे मेट्रो लवकरच पुणेकरांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे. पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पीसीएमसी ते स्वारगेट  आणि वनाझ ते रामवाडी या दोन मार्गिका आहेत. पीसीएमसी ते स्वारगेट हि  11.4 किमी ची मार्गिका असून त्यामध्ये 14  स्थानके असणार आहेत. पीसीएमसी ते स्वारगेट या मार्गिकेमध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट हा 6 किमीच्या भूमिगत असून यामध्ये 5 स्थानके असणार आहेत.  वनाझ ते रामवाडी हि 15.7 किमीचा मार्गिका पूर्णतः उन्नत असून त्यामध्ये 16 स्थानके आहेत.

पीसीएमसी ते फुगेवाडी हि 7 किमीची मार्गिकेची निरीक्षण मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त यांनी जानेवारी 2021 मध्ये पूर्ण करून हि मार्गिका प्रवाश्यांसाठी खुली करण्यासंबंधी मान्यता दिली आहे.  वनाझ ते गरवारे या 5 किमीच्या मार्गिकेची मेट्रो रेल्वे संख्या आयुक्त यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये निरीक्षण पूर्ण करून हि मार्गिका प्रवाशांना खुले करणे संबंधी मान्यता  दिली आहे.

वनाझ ते गरवारे व पीसीएमसी ते फुगेवाडी या मार्गिकांना मेट्रो रेल संख्या आयुक्त यांची मान्यता मिळाल्यामुळे  हा 18 किमी व 10 मेट्रो स्थानके असलेले मार्ग प्रवाश्यांसाठी लवकरच खुले होणार आहेत.  टप्प्या टप्प्याने उर्वरित 21 किमी मार्ग  एक वर्षाच्या आत खुला करण्यात येणार आहे .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.