Bhosari : कंपनीतून अडीच लाखांचे साहित्य चोरी

एमपीसी न्यूज – मशीन लायनर, डाईच्या पिना, डाई बनविण्याचे मटेरियल, पंचेस व ब्लॉक, तसेच रॉ मटेरियलच्या प्लेटा असे एकूण अडीच लाखांचे साहित्य दोघांनी चोरीच्या उद्देशाने कंपनीतून नेले. हा प्रकार भोसरी एमआयडीसीमध्ये 30 डिसेंबर 2019 रोजी रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान घडला.

लक्ष्मण देवराव गणगे (वय 55, रा. मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर, पुणे) यांनी याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंपनीतील कामगार नरहरी पांडुरंग शिंदे व भाग्यश्री ट्रान्सपोर्टचे चालक शंकर मराठे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणगे यांची भोसरी एमआयडीसीत ॲटोप्रेस इंजिनियरिंग प्रा. लि. ही कंपनी आहे. या कंपनीतील कामगार आरोपी शिंदे व भाग्यश्री ट्रान्सपोर्टचा चालक आरोपी मराठे या दोघांनी गणगे यांच्या कंपनीतून मशीन लायनर, डाईच्या पिना, डाई बनविण्याचे मटेरियल, पंचेस व ब्लॉक, तसेच रॉ मटेरियलच्या प्लेटा चोरीच्या उद्देशाने घेऊन गेले. एकूण अडीच लाखांचे साहित्य दोघांनी लंपास केले. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.