Pune : संपूर्ण पुणे शहरात गुरुवारी पाणी नाही; शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा

एमपीसी न्यूज – पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे जलशुद्धीकरण केंद्रांचे, नवीन होळकर पंपिंग विषयक कामे करण्यात येणार असल्याने संपूर्ण पुणे शहरात गुरुवारी (दि. 6 फेब्रुवारी) पाणी येणार नाही. तर, शुक्रवारी (दि. 7 फेब्रुवारी) सकाळी आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पुणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी, डेक्कन, शिवाजीनगर, स्वारगेट, कर्वे रोड, कोथरूड कर्वेनगर, हिंगणे, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, धनकवडी, कात्रज, कोंढवा, पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, बावधन, बाणेर, पुणे स्टेशन, कोरेगाव पार्क, मुंढवा, येरवडा, वानवडी, हडपसर, विश्रांतवाडी, सोलापूर रस्ता, कळस, धानोरी, लोहगाव भागांत येत्या गुरुवारी पाणी येणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.