Thergaon : जमीन विक्रीत फसवणूक केल्या प्रकरणी महिलेवर गुन्हा

एमपीसी न्यूज – सर्वे नंबर चुकीचा सांगून जमीन विक्री (Thergaon) करत महिलेने नागरिकांची फसवणूक केल्याचा गुन्हा वाकड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी 2021 ते 11 मार्च 2023 या कालावधीत थेरगाव गावठाण येथे घडला.

शांताराम श्रीपती जगताप (वय 67, रा. थेरगाव गावठाण) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सीमा राजेंद्र शेलार (रा. थेरगाव गावठाण) या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maval : खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रकांत पाटील क्रिकेटच्या मैदानात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने थेरगाव गावठाण मधील सर्वे नंबर 4/9 मधील 41 गुंठे आणि 4/16 मधील 56 गुंठे जमिनीचा बनावट नकाशा तयार केला. ती जमीन सर्वे नंबर 4/17 मधील असल्याचे भासवून लोकांना नोटरी दस्त करून जमीन विकली. त्या मोबदल्यात महिलेने लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन त्यांची फसवणूक केली. जमिनीची मोजणी (Thergaon) केलेल्या खुणा काढून त्याची विल्हेवाट लावली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.