Pune News : असा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा…

एमपीसी न्यूज : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यात ते मेट्रोच्या दोन टप्प्याचे उद्घाटन करणार आहेत. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुणे महापालिकेतील स्मारकाचे अनावरण करणार आहेत. तर विविध विकास कामांचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे. कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा देखील होणार आहे. तर कसा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजचा पुणे दौरा पाहुयात..

असा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा

:- सकाळी 10.25

लोहगाव विमानतळावर आगमन

:- सकाळी 10.45

हेलिकॉप्टर ने कृषी महाविद्यालय येथे आगमन

:- सकाळी 11.00

मनपा आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण

:- सकाळी 11.30

मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन

गरवारे ते आनंदनगर प्रवास करणार

:- दुपारी 12.00

एमआयटी महाविद्यालयाच्या प्रांगणात पंतप्रधान मोदी दाखल होतील

:- दुपारी 12.30

पी एम पी एम एल च्या 100 इ बस आणि ई बस डेपो चे लोकार्पण

:- दुपारी 1.45

लवळे येथील सिंबोसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला उपस्थिती

:- दुपारी 2.30

पुणे लोहगाव विमानतळ येथून दिल्ली कडे प्रस्थान

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.