Chinchwad : रामनगर येथे पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवकडकर एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जात असतना दुसरीकडे चिंचवड रामनर येथे आज (मंगळवारी) पहाटे जलवाहिनी फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया गेले. यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

चिंचवड, रामनगर येथील सहजीवन कंपनीसमोरील पाण्याची पाईपलाईन आज पहाटे फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली. परिसर संपुर्ण जलमय झाला आहे. एककीकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग गेल्या सहा महिन्यांपासून दिवसाआड पाणीपुरवठा करत असताना दुसरीकडे पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी होत आहे.

यामुळे शहरवासीयांकडून संताप व्यक्त केला जातोय. दरम्यान, पाईपलाईन कशामुळे फुटली हे समजले नाही. पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी गेले असून दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.