Sangvi : व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने तीस लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची तीस लाखांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार मे 2022 ते 19 ऑगस्ट 2023 या कालावधीत सांगवी येथे घडला.

Sangvi : भरधाव दुचाकीची पीएमपी बसला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

चेतन दशरथ गिरी (वय 30, रा. पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अंकित केतन सावला (रा. मोई, ता. खेड) आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून त्यांच्या बाबा रिसायकलिंग या प्लास्टिक प्लांटमध्ये खूप आर्थिक फायदा होत असल्याचे भासवून फिर्यादी यांना जास्त परताव्याचे आमिष दाखवले.

त्यापोटी फिर्यादी यांना 30 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांना कोणताही आर्थिक मोबदला न देता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.