Mobile theft : रूम मध्ये चार्जिंग साठी लावलेले तीन मोबाईल चोरीला, मोबाईल चोर अटकेत

एमपीसी न्यूज : रूम मध्ये चार्जिंग साठी लावलेले तीन मोबाईल चोरणाऱ्यास वाकड पोलिसांनी अटक केले आहे. उघड्या दरवाजा वाटे प्रवेश करत चोरट्याने ते मोबाईल चोरी केले आहेत.(Mobile theft) याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत कैलास प्रजापती, वय 22 वर्षे रा. काळेवाडी यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रितेश मोरे, वय 19 वर्षे, रा. काळेवाडी या आरोपीस अटक करण्यात आले आहे.(Mobile theft)या आरोपी विरोधात भादवि कलम 380 अन्वये वाकड पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri News : पिंपरीत शनिवारी धम्म मेळावा; ॲड. प्रकाश आंबेडकर मार्गदर्शन करणार

फिर्यादी व त्यांच्या मित्रांनी त्यांचे तीन वेगवेगळे मोबाईल किंमत रुपये 21,000 हे रूम मध्ये चार्जिंगला लावले असताना कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांचे रूमच्या उघड्या दरवाजाच्या वाटे प्रवेश करून ते मोबाईल चोरी करून नेले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.