Mumbai Pune Expressway : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली फुडमाॅल समोर पुन्हा तीन वाहनांचा अपघात

तीन जण जखमी

0

एमपीसी न्यूज : : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली फुडमाॅल समोर आज पुन्हा तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. सुदैवाने यामध्ये कसलीही जिवितहानी झाली नाही. मात्र तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. सोमवारी याच ठिकाणी पाच वाहनांचा भिषण अपघात झाला होत. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला होता.

_MPC_DIR_MPU_II

 मिळालेल्या माहितीनुसार बोर घाटाचा तिव्र उतार उतरल्यानंतर खोपोली फुडमाॅल समोर सरळ रस्ता आहे. घाट भागातील उताराने मोठ्या वाहनांचे चालक इंधन वाचविण्यासाठी गाड्या न्युट्रल करतात, यामुळे गाड्याचा वेग वाढता तसेच अचानक ब्रेक मारल्यास तो लागत नाही.

यामुळे खोपोली फुडमाॅल समोरील  परिसरात वारंवार अपघात घडत आहेत. आजचा अपघात हा दोन बस व एका ट्रकमध्ये झाला. सुदैवाने हा किरकोळ होता अन्यथा बसमधील प्रवाश्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातामुळे काहीकाळ वाहतुक बंद झाल्याने खालापूर टोलनाक्यावर वाहनांची गर्दी झाली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.