Pune : परिपूर्तीच्या माध्यमातून बदलत्या परिस्थितीत महिलांसमोरील आव्हानांचा अभ्यास होणार – विजया रहाटकर

एमपीसी न्यूज – महिलांची आर्थिक सक्षमता संपत्तीमधील त्यांचा नेमका अधिकार त्यांच्या पुढील विविध समस्या, सामाजिक सुरक्षा आणि समानता अशा विविध आव्हानांचा बदलत्या स्थितीमध्ये अभ्यास करण्याची गरज आहे आणि हे काम परिपूर्ती या अभिनव महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून केला जाईल, असा विश्‍वास राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजय रहाटकर यांनी व्यक्त केला आहे.

येथील डीईएस नवलमल फिरोदिया लॉ कॉलेजतर्फे नव्याने सुरु करण्यात आलेल्या वुईमेन्स स्टडी सेल परिपूर्ती या प्रकल्पाचे उद्घाटन रहाटकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रोहिणी होनप, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष नितीन आपटे व्यासपीठावर उपस्थित होते.

महिलांच्या विकासासाठी राज्य आणि केंद्र सरकार विविध योजनांच्या माध्यमातून काम करीत असले, नवीन कायदे केले जात असले तरीपण ते पुरेसे नाहीत. सामाजिक संस्था अथवा अशा नाविन्यपूर्ण प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांच्या समोरील समस्यांचा नव्याने अभ्यास होणे गरजेचे आहे. आर्थिक अद्यमानता किंवा घटस्फोटाबाबतची प्रकरणे, समाजिक सुरक्षा अशा विविध प्रश्‍नांवर संशोधनात्मक अभ्यास करण्याची आवश्यकता असून त्यााबाबतच्या अंमल बजावणीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला जावा. कारण या कामाची नितांत आवश्यकता आहे.

महिला आयोगाच्या वतीने आजवर करण्यात आलेल्या कामाकाजाची माहिती देऊन त्यांनी सांगितले की, आयोगाच्या वतीने डिजिटली लिटरसी हा उपक‘म हाती घेतला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानापासून महिला वर्ग दूर राहू नये कारण आज दैनंदिन कामकाजात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढतो आहे. अनेक व्यवहार ऑनलाईनच्या माध्यमातून करण्यात येत आहे. ऑनलाईनच्या बरोबरीने विविध ऍपचा वापर कशाप्रकारे वाढविता येईल हे लक्षात घेऊन उपक्रम हाती घेतले जात आहेत. यासंदर्भात जो अभ्यास संशोधन झाले त्याचा अहवाल राज्य व केंद्र सरकारला पाठवण्यात आले आहेत. याबाबत काही कायदे करण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी सांगितली.

प्राचार्या होनप यांनी प्रस्ताविकामध्ये या नवीन प्रकल्पाच्या स्थापनेमागची भूमिका सांगितली तसेच नजीकच्या काळात शोध निबंधाचा प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केली. सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये महिलांची भूमिका तसेच महिलांसमोरील विविध समस्या व त्यावरील उपाययोजना यावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केली. महाविद्यालयाच्या परिसरामध्ये स्वच्छतेचे काम करणार्‍या तीन महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला. त्यामध्ये लक्ष्मी, शकुंतला व सुनिता यांचा समावेश आहे. प्रारंभी दीपप्रज्वलन झाल्यावर शुभंकर मालेगावकर यांनी स्वागत केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.