Alandi : भर दिवसा घरफोडी करून सव्वालाखांचा ऐवज पळवला

एमपीसी न्यूज – घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी 1 लाख 22 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. हा प्रकार 28 जानेवारी रोजी दुपारी दोन ते सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास च-होली येथे घडला.

_MPC_DIR_MPU_II

स्वरूपा योगेश हळदणकर (वय 28, रा. तनिष सृष्टी, च-होली) यांनी या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा फ्लॅट 28 जानेवारी रोजी दुपारी दोन ते सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास कुलूप लावून बंद होता. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बनावट चावीच्या सहाय्याने फ्लॅट उघडून फ्लॅटमधील लाकडी कपाटात ठेवलेले 1 लाख 22 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.