Today’s Horoscope 03 June 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 03 June 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – शनिवार.

03.06.2023.

शुभाशुभ विचार – 11 पर्यंत चांगला दिवस.

आज विशेष – वटपौर्णिमा.

 राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र- 06.16 पर्यंत विशाखा नंतर अनुराधा.

चंद्र राशी – वृश्चिक.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- केशरी )

कार्यक्षेत्रात नवे उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस तितकासा चांगला नाही. झटपट लाभाचा मोह टाळायलाच हवा. एखाद्या विश्वासू माणसाकडूनही विश्वासघात होऊ शकतो. वाहन चालवताना काळजी घ्या.

वृषभ (शुभ रंग- जांभळा)

गोड बोलून आपला स्वार्थ साधाल. कार्यक्षेत्रात स्वतःचे महत्त्व सिद्ध करता येईल. व्यावसायिकांनी स्पर्धकांना कमजोर समजून चालणार नाही. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या मताने वागणे हिताचे राहील.

मिथुन ( शुभ रंग- पांढरा)

नोकरीच्या ठिकाणी आज तुम्ही वरिष्ठांच्या मर्जीत राहाल. तब्येत तुमची आज थोडी नरमच राहील. जुनी दुखणी अंगावर काढू नका. वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीस प्रवेश नको.

कर्क (शुभ रंग- निळा.)

कार्यक्षेत्रातील तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ राहील. दुपारनंतर काही बिकट प्रश्न सहजच सोडवाल. डॉक्टरांना आज असाध्य आजारावर अचूक उपाय सापडेल.

सिंह (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

मंदावलेल्या व्यापार उद्योगास चांगली गती येईल. महत्त्वाच्या चर्चेत तुम्ही आपल्या मतावर ठाम राहाल. स्थावराची खरेदी विक्री फायद्यातच राहील. आज तुम्ही घर सजावटीस प्राधान्य द्याल.

कन्या ( शुभ रंग- पिस्ता)

नवीन व्यावसायिकांनी आपल्या मर्यादा ओळखूनच आर्थिक उलाढाली कराव्यात. अति आत्मविश्वास ही नुकसानास कारणीभूत ठरू शकतो. घराबाहेर वावरताना रागावर लगाम ठेवा.

तूळ ( शुभ रंग- आकाशी)

आज मोठे आर्थिक व्यवहार सतर्कतेने करा. अनावश्यक खर्च टाळा. दिवसाच्या उत्तरार्धात एखाद्या मोठ्या खर्चाची तयारी ठेवावी लागेल. वृद्धांनी तळपायांची काळजी घ्यावी.

वृश्चिक (शुभ रंग- चंदेरी)

आज तुमची तब्येत थोडीशी नारमच असेल. क्षुल्लक गोष्ट फार मनाला लावून घ्याल. आज जशास तसे या धोरणाने वागा. अधिकाराचा गैरवापर मात्र टाळा.

धनु- (शुभ रंग- भगवा)

आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. आज ज्येष्ठांची पावले मनशांतीसाठी सत्संगाकडे आपोआपच वळतील.

मकर ( शुभ रंग- पांढरा)

नोकरीच्या ठिकाणी बढतीच्या मार्गातील अडथळे आता दूर होतील. अधिकार योग चालूनच येतील. आज सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. मोठा भाऊ आज तुम्हाला योग्य सल्ले देईल.

कुंभ (शुभ रंग -गुलाबी)

आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्यास प्राधान्य देणार आहात. इतरांच्या कामासाठी आपल्या अधिकाराचा वापर कराल. रखडलेली शासकीय कामे गती घेतील.

मीन -(शुभ रंग – क्रीम )

कार्यक्षेत्रात डोक्यात ताप देणाऱ्या काही घटना घडणार आहेत. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ जितके विचारतील तितकेच सांगा फार खोलात शिरून तुमच्याच अडचणी वाढतील.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.