Today’s Horoscope 05 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 05 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – गुरुवार.

05.10.2023.

शुभाशुभ विचार- वृद्धी दिन. 

आज विशेष- सप्तमी श्राद्ध.

राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00.

दिशा शूल – दक्षिणेस असेल.

आजचे नक्षत्र – मृग 19.40 पर्यंत नंतर आर्द्रा.

चंद्र राशी – मिथुन.

————————————

मेष – ( शुभ रंग- मोरपंखी )

व्यापार उद्योगाची चक्रे गतिमान होतील. महत्त्वाच्या चर्चेत आपली मते इतरांवर लादू शकाल. स्थावराची खरेदी विक्री फायद्यात राहील. गृहिणी आज घर सजावटीस प्राधान्य देतील.

वृषभ (शुभ रंग- हिरवा )

नवीन व्यवसायात मर्यादा ओळखून आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. अति आत्मविश्वास ही आज नुकसानास कारणीभूत ठरेल. घराबाहेर वावरताना रागावर नियंत्रण ठेवायला हवे.

मिथुन ( शुभ रंग- डाळिंबी )

आज आर्थिक व्यवहारात सावध असायला हवे. अनावश्यक खर्च टाळायला हवा. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा मोठा खर्च उद्भवू शकतो. वृद्ध मंडळींनी तळपायांची काळजी घ्यावी.

कर्क (शुभ रंग- राखाडी )

नोकरीच्या ठिकाणी तुमच्या मनासारख्या घटना घडतील. विरोधकही तुमची मते मान्य करतील. आज अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा. वाहतुकीचे नियम तंतोतंत पाळायला हवेत.

सिंह (शुभ रंग- गुलाबी )

आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकलायला हवेत. आज जेष्ठांची पावले सत्संगाकडे आपोआपच वळतील.

कन्या ( शुभ रंग- आकाशी)

नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. अधिकार योग चालूनच येतील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. मोठा भाऊ आज तुम्हाला योग्य सल्ले देईल.

तूळ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्यास प्राधान्य देणार आहात. इतरांच्या कामासाठी आपल्या अधिकारांचा वापर कराल. रखडलेली शासकीय कामे गती घेतील.

वृश्चिक (शुभ रंग- तांबडा)

कार्यक्षेत्रात डोक्याला ताप देणाऱ्या काही घटना घडतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ जितके विचारतील तितकेच उत्तर द्या. फार खोलात शिरून तुमच्याच अडचणी वाढवून घ्याल.

धनु- (शुभ रंग- सोनेरी )

कार्यक्षेत्रात नवे उपक्रम सुरू करण्यासाठी आज दिवस अनुकूल नाही. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. वैवाहिक जीवनातही फार अपेक्षा नकोत. चाललय ते बर चाललंय. सामान्य दिवस.

मकर ( शुभ रंग- जांभळा )

सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. व्यावसायिकांनी स्पर्धकांना कमजोर समजू नये. भागीदारी मधे देण्या घेण्याचे व्यवहार चोख असलेले बरे.

कुंभ (शुभ रंग – निळा)

नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या मर्जीत राहाल. आज तब्येत थोडी नरमच राहील. जुनी दुखणी अंगावर काढू नका. वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीचा विषय नको.

मीन -(शुभ रंग – पांढरा)

तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ मिळेल. दुपारनंतर काही बिकट प्रश्न सहजच सुटतील. असाध्य आजारावर डॉक्टरांना अचूक उपाय सापडेल.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.