Today’s Horoscope 07August 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 07 August 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – सोमवार.

07.08.2023.

शुभाशुभ विचार- 17 नंतर चांगला दिवस

आज विशेष- सामान्य दिवस

राहू काळ – सकाळी 7.30 ते 09.00.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र – अश्विनी.

चंद्र राशी – मेष.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- तांबडा )

आजचा दिवस तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल असून आज सर्व कामे सुरळीत पार पडतील. गृहसौख्य लाभेल. आज तुम्ही जोडीदारास एखादे सरप्राईज गिफ्ट द्याल.

वृषभ (शुभ रंग- पिस्ता )

आज जरा स्वतःच्या स्वार्थाकडे लक्ष असू द्या. परमार्थाचा अतिरेक नको. केवळ मोठेपणासाठी न परवडणारा खर्च करू नका. ज्येष्ठांनी हाती असलेली पुंजी जपून वापरावी.

मिथुन ( शुभ रंग- निळा )

व्यावसायिकांची आवक वाढेल. पैशा अभावी रखडलेले उपक्रम सुरू करता येतील. मुलांचे विवाह योग जुळून येतील. आप्तसकीय तुमच्या शब्दास मान देतील.

कर्क (शुभ रंग- पांढरा)

व्यावसायिक आपली टार्गेट पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम करतील. नोकरदारांना वरिष्ठांचे मूड सांभाळावे लागतील. मित्र आज तुम्हाला खोटी आश्वासने देतील.

सिंह (शुभ रंग- मरून )

नोकरीच्या ठिकाणी असलेल्या नियमांचे उल्लंघन करू नका. वाहतुकीचे नियम मोडल्यास दंड भरावाच लागेल. काही घरगुती समस्या वडीलधाऱ्यांच्या मदतीने सुटतील.

कन्या ( शुभ रंग- मोतिया)

तुमच्या कार्यक्षेत्रात नकळत झालेल्या चुकीमुळे काही आर्थिक नुकसान होऊ शकते. आज मोठे आर्थिक व्यवहार जपूनच करा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण हवेच.

तूळ ( शुभ रंग- मोतिया)

वेळीच घेतलेले योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन या कारणाने कार्यक्षेत्रात यशाची कमान चढती राहील. आज वैवाहिक जीवनातही सुसंवाद असेल. गृहसौख्य लाभेल.

वृश्चिक (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज नोकरदारांवर कामाचा ताण वाढेल. तेच तेच काम कंटाळवाणे वाटेल. ज्येष्ठांना काही तब्येतीच्या तक्रारी हैराण करतील. दुकानदारांच्या गल्ल्यात लक्षणीय वाढ होईल.

धनु- (शुभ रंग- मोरपिशी)

उच्चशिक्षित तरुणांच्या अपेक्षा वाढतील. एखाद्या नव्या विषयात गोडी निर्माण होईल. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. आज तुम्ही मुलांचे लाड पुरवण्याचा प्रयत्न कराल.

मकर ( शुभ रंग- आकाशी )

आज घरगुती व्यवसाय तेजीत चालतील. बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. व त्यांना घराजवळच एखादा रोजगार मिळू शकेल. प्रेम प्रकरणे फक्त मनस्ताप देतील.

कुंभ (शुभ रंग – हिरवा)

आज एखाद्या महत्त्वाच्या कामानिमित्त तुमचा बराचसा वेळ घराबाहेरच जाईल. प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये असलेली तुमची उठबस व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने कमी येईल. वाद मात्र टाळा

मीन -(शुभ रंग – चंदेरी )

कार्यक्षेत्रातील पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल व यश अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. वाणीत गोडवा ठेवाल तर अनेक बिकट प्रश्न सहजच सुटतील.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.