Today’s Horoscope 07 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 07 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – मंगळवार.

07.03.2023.

शुभाशुभ विचार- करीदिन.

आज विशेष- धुलीवंदन.

राहू काळ – दुपारी 3.00 ते 4.30. 

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आजचे नक्षत्र – पूर्वा फाल्गुनी.

चंद्र राशी – सिंह.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- डाळिंबी )

आज तुमच्यात चैनी व विलासी वृत्ती बळावेल. उंची वस्त्र खरेदी कराल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असलेले व्यवसाय तेजीत चालतील. नवोदित कलावंत मिळालेल्या संधीचे सोने करतील.

वृषभ (शुभ रंग- मरून )

स्थावर शेतीवाडी संबंधित काही रखडलेले व्यवहार असतील तर ते आज मार्गी लागतील. मुलांची अभ्यासात एकाग्रता राहील. आज प्रेम प्रकरणात फसवणूक संभवते.

मिथुन ( शुभ रंग- पिस्ता )

आज काम कमी तुमची दगदगच जास्त होईल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होणार आहे.  शेजाऱ्यांशी एकोपा राहील. रिकाम टेकड्या चर्चेतून काहीही निष्पन्न होणार नाही.

कर्क (शुभ रंग- पांढरा.)

आवक पुरेशी असली तरीही आज बचतीस प्राधान्य देणे हिताचे राहील. क्षुल्लक  कारणांवरून शेजाऱ्यांशी मतभेदाची शक्यता आहे. गोड बोलून आपला स्वार्थ साधावा लागेल.

सिंह (शुभ रंग- मरून )

आज तुमची तब्येत थोडी नरमच असेल. क्षुल्लक गोष्ट फारच मनाला लावून घ्याल. आज जशास तसे या धोरणाने वागा. मोफत सल्लागार मंडळींना जरा लांबच ठेवा.

कन्या ( शुभ रंग- जांभळा)

पर्यटनाचे व्यवसाय चांगले चालतील. घरात आज थोर मंडळींशी काही वैचारिक मतभेद होतील  अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. थोडी भटकंती होईल.

तूळ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून बऱ्याच दिवसापासून ज्या काही अपुऱ्या इच्छा पूर्ण होतील. वाहन, वास्तू खरेदीतील अडथळे दूर होतील. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व करून दाखवाल.

वृश्चिक (शुभ रंग- मोतिया)

उद्योगधंद्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस असून नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य राहील. हाताखालचे लोक तुमच्याशी आदराने वागतील. आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्यास प्राधान्य द्या.

धनु- (शुभ रंग- लाल)

महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात वडीलधाऱ्यांचे मत अवश्य घ्या. आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. कायद्याची चौकट मोडणे महागात पडू शकते सतर्क रहा.

मकर ( शुभ रंग- मोरपंखी )

एखाद्या विश्वासू माणसाकडूनही विश्वासघात होईल. आज चांगले मित्र ही दगा देऊ शकतात. कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकणे गरजेचे आहे. वाहन चालवताना काळजी घ्या.

कुंभ (शुभ रंग – केशरी)

आज तुमचे मन काहीसे चंचल राहील. अति उत्साहात काही चुकीचे निर्णय घ्याल. आज प्रवासात काही नवे हितसंबंध जुळून येतील. जोडीदाराशी एकमत राहील.

मीन -(शुभ रंग – निळा )

व्यावसायिकांची येणी वसूल होतील. गोड बोलून आपला स्वार्थ साधून घेण्याची कला तुम्हाला आज चांगली जमेल. कार्यक्षेत्रात आज स्वतःचे महत्त्व सिद्ध करू शकाल.

शुभम भवतु 
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 968916542

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.