Today’s Horoscope 08 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 08 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – शुक्रवार.

तारीख – 08.03.2024.

शुभाशुभ विचार – त्रयोदशी वर्ज्य.

आज विशेष – प्रदोष महाशिवरात्री.

राहू काळ – सकाळी 10.30  ते 12.00 .

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आज नक्षत्र – श्रवण 10.41 पर्यंत नंतर धनिष्ठा.

चंद्र राशी – मकर 21.10  पर्यंत नंतर कुंभ.
—————————–
मेष – ( शुभ रंग – हिरवा)

आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी आज तुमच्यासाठी कमी महत्त्वाच्या असतील. नोकरदारांना प्रमोशनची चाहूल लागेल. आज आपल्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल.

वृषभ – ( शुभ रंग- पिस्ता)

आज तुमच्या प्रयत्नांना दैवाची साथ 100% राहील नोकरीत असाल तर साहेबांची कृपादृष्टी असेल. नास्तिक मंडळी ही आज गरजेपुरती श्रद्धाळू होणार आहेत.

मिथुन – ( शुभ रंग- मरून)

जे चाललंय ते बरंच चाललंय म्हणावे लागेल. कमी श्रमात जास्त लाभाचा मोह नको. धाडसाची कामे आज टाळली तर बर होईल. सासुरवाडी कडून एखाद्या लाभ होऊ शकतो.

कर्क – (शुभ रंग – डाळिंबी)

वैवाहिक जीवनात सुसंवाद असेल. जोडीदाराला दिलेले शब्द पाळाल. व्यवसायात भागीदारांशी एकमत राहील. आज तुम्ही एखादा विवाह जुळविण्यात मध्यस्थी कराल.

सिंह -( शुभ रंग – गुलाबी )

तुमच्या सामाजिक प्रतिष्ठित वाढ होईल. आज घरात सज्जनांची उठबस असेल. गृहिणी स्वतःचे छंद जपतील. जमाखर्चाचा तराजू समतोल असेल. गृह सौख्याचा दिवस.

कन्या – ( शुभ रंग- क्रीम)

आज काहीसे लहरीपणाने वागाल. हातचे सोडून पळत्या मागे धावावेसे वाटेल. तरुणांना आज प्रलोभने आकर्षित करतील. आज थोडा संयम बाळगण्याची गरज आहे.

तूळ-  ( शुभ रंग- पांढरा)

आपल्या कुटुंबीयांना अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी कराल. आज तुम्ही मुलांचे वाढते हट्ट हौशीने पुरवाल. आज मुलांच्या शिस्तीकडेही लक्ष द्यायला हवे.

वृश्चिक – ( शुभरंग – चंदेरी)

एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी आज वणवण भटकावे लागण्याची शक्यता आहे. गृहिणी शेजार धर्म पाळतील. जवळपासचे प्रवासात काही फायदेशीर ओळखी होतील

धनु – (शुभ रंग- जांभळा)

आर्थिक बाजू भक्कम असल्याने सर्व कामे सुरळीत पार पडतील. सभा संमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. गृहिणी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतील.

मकर-  (शुभ रंग- पांढरा)

आज खिशात पैसा खेळता असल्याने तुमची मानसिक स्थिती उत्तम असेल. तुमच्यातील सकारात्मकता इतरांना प्रभावित करेल. इतरांना दिलेले शब्द तुम्ही आवर्जून पाळाल.

कुंभ – (शुभ रंग- आकाशी)

आज मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीनेही तुम्ही भारावून जाल. प्रवास कार्य साधक होतील. कंजूषणा न करता काही अत्यावश्यक खर्च तुम्हाला करावेच लागणार आहेत.

मीन – ( शुभ रंग- सोनेरी)

नोकरीच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील प्रयत्नांना आज नशिबाची साथ नक्की मिळेल.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.