Today’s Horoscope 24 July 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – रविवार  (Today’s Horoscope 24 July 2022)
              
शुभाशुभ विचार – चांगला दिवस

  

आज विशेष – कामिका एकादशी 

 

राहू काळ – सायंकाळी 4.30 ते 6.00

 

दिशा शूल – पश्चिमेस असेल

 

आजचे नक्षत्र – रोहिणी 22.00 पर्यंत नंतर मृग

 

चंद्र राशी –  वृषभ
_________________________
आजचे राशीभविष्य

 

मेष – ( शुभ रंग- पांढरा)
आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल. आपल्या आवडत्या क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळू शकेल. राशीच्या धनस्थानातून भ्रमण करणारा चंद्र अनपेक्षित पैसा मिळवून देईल.

 

वृषभ – ( शुभ रंग- आकाशी)
आज तुम्ही फक्त स्वतःचा विचार करा. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या टाळणे हिताचे राहील. धंद्यात वाढती स्पर्धा तुम्हाला बेचैन करेल. जमाखर्चाचा तराजू डळमळीत होणार आहे

 

मिथुन -( शुभ रंग – मोरपंखी)
नव्या उपक्रमांची सुरुवात उद्यावरच ढकललेली बरी. काही अती आवश्यक खर्च हात जोडून उभे असतील. जमाखर्चाचा मेळ घालणे अवघड जाईल. देणी चुकवावी लागतील

 

कर्क – (शुभ रंग – पिस्ता)
व्यवसायात आर्थिक उलाढाल वाढेल. कार्यक्षेत्रात नवी आव्हाने स्वीकाराल. स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. वैवाहिक जीवन सौख्य पूर्ण राहील.

 

सिंह – ( शुभारंभ- डाळिंबी)
वादविवादात आज तुम्ही स्वतःचेच घोडे पुढे दामटवाल. हाताखालच्या मंडळींना तुमचे दडपण जाणवेल. आज आर्थिक व्यवहारात मात्र सावध राहणे गरजेचे आहे.

 

कन्या – (शुभ रंग- सोनेरी)
क्षुल्लक कामातही अडचणींचा सामना करावा लागेल. कार्यक्षेत्रात वाढत्या स्पर्धेमुळे थोडेफार नैराश्य जाणवेल. संध्याकाळी सत्संगाकडे पावले आपोआप वळतील.

 

तूळ – (शुभ रंग – चंदेरी)
आज तुम्ही जे काही कराल ते तब्येतीला जपूनच करा  विवाह जुळवण्याविषयी चर्चा आज नकोतच. अंगमेहनतीची कामं करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षिततेस प्रथम प्राधान्य द्यावे

 

वृश्चिक – (शुभ रंग -केशरी)
आज तुम्ही व्यवसायातील वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. अडचणीच्या प्रसंगी पत्नीची साथ मोलाची राहील. पारिवारिक सदस्यांमध्ये सलोखा राहील.

 

धनु – (शुभ रंग- सोनेरी)
ध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. अहो सर सलामत तो पगडी पचास हे लक्षात ठेवा. काही येणी असतील तर न मागता वसूल होतील.

 

मकर- (शुभ – रंभ क्रीम)
घरात आधुनिक सुखसोयी साठी खर्च कराल. कार्यक्षेत्रात तुम्हाला पूर्वी केलेल्या कष्टाचे फळ मिळेल. कलाकारांची लोकप्रियता वाढेल. आनंदी दिवस.

 

कुंभ – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
आनंदी व उत्साही असा आजचा दिवस आहे. आज कुटुंबीयांचे हट्ट पुरवण्याचा प्रयत्न कराल. मन जरासे चंचल राहील. कार्यक्षेत्रात हातचे सोडून मृगजळा मागे जाऊ नका.

 

मीन – ( शुभ रंग- मरून)
दैनंदिन कामात काही अडचणींना तोंड द्यावे लागेल. मुलांना अभ्यास सोडून आज सर्व काही सुचेल. टेलिफोन बिल भरावे लागणार आहे. शेजाऱ्यांशी आज गोडी गुलाबी राहील.

 

 

!! शुभम भवतु!!

 

 

श्री जयंत कुलकर्णी

 

फोन ९६८९१६५४२४

 

 

( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.