Today’s Horoscope 11 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 11 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – बुधवार

11.10.2023.

शुभाशुभ विचार- 18 पर्यंत चांगला दिवस. 

आज विशेष- द्वादशी श्राद्ध.

राहू काळ – दुपारी 12.00 ते 01.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आजचे नक्षत्र – मघा 08.45 पर्यंत नंतर पूर्व फाल्गुनी.

चंद्र राशी – सिंह.

—————-——————–

मेष – ( शुभ रंग- निळा )

तुमच्या प्रामाणिक मेहनतीस नशिबाची उत्तम साथ मिळेल. कार्यक्षेत्रात काही नवीन संधी चालून येतील. नवोदित कलाकार मिळालेल्या संधीचे सोने करतील.

वृषभ (शुभ रंग- केशरी )

व्यापार उद्योगास चांगली गती येईल. महत्त्वाच्या चर्चेत आपल्या मतावर ठाम राहाल. स्थावराचे अपुरे व्यवहार मार्गी लागतील. विद्यार्थ्यांनी पालकांच्या अज्ञात राहावे.

मिथुन ( शुभ रंग- मोरपंखी )

जात काही कळत नाही त्यात उगीच डोकं घालू नका. अति आत्मविश्वास ही नुकसानच कारणीभूत ठरू शकतो. काही अति हुशार मंडळी भेटतील. आज कमीच बोला.

कर्क (शुभ रंग- पांढरा )

कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. आज वाणीत गोडवा ठेवाल तर अनेक किचकट कामे सोपी होतील. आज पाहुण्यांची उठवस आनंदाने कराल.

सिंह (शुभ रंग- मरून )

कार्यक्षेत्रात तुमच्या शब्दाला मान राहील. व्यापाऱ्यांची आवक मुबलक असेल. आज कारण नसताना इतरांच्या भानगडीत लक्ष घालाल प्रवासात खोळंबा संभवतो.

कन्या ( शुभ रंग- जांभळा)

आर्थिक व्यवहारात सावध असणे गरजेचे आहे. आज एकाच्या भरवशावर दुसऱ्याच शब्द देऊ नका. आज फक्त स्वार्थाकडे लक्ष द्या. परमार्थ परवडणारा नाही.

तूळ ( शुभ रंग- आकाशी )

नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. विरोधकही आज नमतेच घेतील. संततीकडून महत्त्वाचे समाचार येतील.

वृश्चिक (शुभ रंग-मोतिया)

आज तुम्ही आपले अधिकार वापरून इतरांची कामे करू शकाल. हाताखालच्या माणसांवर तुमचा वचक राहील. विरोधकांनाही तुमच्या कामाची पद्धत आवडू लागेल.

धनु- (शुभ रंग- डाळिंबी)

नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. पण हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह टाळा. संयम ठेवा. ज्येष्ठांना उपासनेची प्रचिती येईल.

मकर ( शुभ रंग- चंदेरी )

आज उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस असून मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. ज्येष्ठ मंडळींना आज सत्संगातून मनशांती मिळेल. आज कोणतेच धाडस नको.

कुंभ (शुभ रंग – भगवा)

सगळी महत्त्वाची कामे दिवसाच्या पूर्वार्धातच उरकलेली बरी. भागीदारीच्या व्यवहारात पारदर्शकता असायला हवी. आज संध्याकाळी फक्त आपल्या जोडीदाराला वेळ देणे महत्त्वाचे आहे.

मीन -(शुभ रंग – लाल)

नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. आज तब्येत थोडी नरमच असेल. पती-पत्नी मधील मतभेद आज दुपारनंतर निवळतील.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क -9689165424.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.