Today’s Horoscope 26 July 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –  वार मंगळवार  (Today’s Horoscope 26 July 2022) 
                  
शुभाशुभ विचार – वर्ज्य दिवस

 

आज विशेष — शिवरात्री 

 

राहू काळ – दुपारी 03.00 ते  4.30

 

दिशा शूल – उत्तरेस असेल

 

आजचे नक्षत्र – आर्द्रा

 

चंद्र राशी –  मिथुन
_________________________
आजचे राशीभविष्य

 

मेष – ( शुभ रंग- तांबडा)
आज घरा बाहेर पडताना जिभेवर साखर ठेवलेली बरी.  एखादा शेरास सव्वाशेर भेटू शकतो. आज वाहन दुरुस्तीचा खर्च उद्भवू शकतो. एखाद्या कामासाठी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल.

 

वृषभ – ( शुभ रंग – मोतिया)
आज पैशाची कमतरता अजिबात भासणार नाही घराबाहेर तुमच्या वक्तृत्वाचा व कर्तुत्वाचा ही प्रभाव पडेल. विरोधकही आज मैत्रीचा हात पुढे करतील. आज  स्पष्टवक्तेपणास थोडा आवर घाला.

 

मिथुन – ( शुभ रंग – क्रीम)
योग्य माणसे संपर्कात येतील. मीपणा  सोडून व गोड बोलून स्वार्थ साधून घेणे गरजेचे. कुणालाही सल्ले देण्याच्या भानगडीत न पडता फक्त आपलं कसं चाललय तेवढेच बघा.

 

कर्क – ( शुभ रंग- पांढरा)
काही कारण नसताना आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकवाल. आज गरजूंच्या कमी याल. बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहणार आहे. आज गरजेपुरतेच बोला.

 

सिंह – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असून तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होणार आहे. कार्यक्षेत्रात तुम्ही केलेल्या कष्टांचे चीज होईल. विरोधक नमते घेतील.

 

कन्या – (शुभ रंग- हिरवा)
अधिकारांचा वापर जपून करा.अति स्पष्ट बोलण्याने तुमचे काही हितचिंतकच दुरावण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना काही विनंती करण्यासाठी आजचा दिवस योग्य  नाही.

 

तुळ – (शुभ रंग – जांभळा)
व्यवसायात जाहिरातबाजी वाढवावी लागणार आहे. अविश्रांत मेहनती नंतरच यशाची चाहूल लागेल. नवीन व्यावसायिकांनी आपली कुवत ओळखूनच आर्थिक उलाढाली कराव्यात.

 

वृश्चिक – (शुभ रंग – आकाशी)
आज चुकीच्या वर्तनाने प्रतिष्ठेची हानी होऊ शकेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या चुका काढू नका. विश्वासातील व्यक्तीकडूनही विश्वास घात होऊ शकतो सतर्क राहा.

 

धनु – (शुभ रंग – चंदेरी)
व्यवसायात भागीदरांशी विश्वास दृढ होईल. वैवाहिक जीवनात जुन्या फोटोंचा अल्बम चाळावसा वाटेल. इतरांच्या भांडणात आज यशस्वी मध्यस्थी कराल. प्रवासात  खोळंबा संभवतो.

 

मकर – ( शुभ रंग – निळा)
नोकरदार मंडळी आज वरिष्ठांच्या आज्ञा झेलतील. ज्येष्ठ मंडळींना आज डॉक्टरांच्या भेटीचे योग अटळ आहेत. व्यवसायात जुनी उधारी वसूल होईल. कष्टांचा अतिरेक नको. तब्येतीस जपा.

 

कुंभ – ( शुभ रंग- भगवा)
तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. ज्येष्ठांना उत्तम प्रकृतीस्वास्थ्य लाभेल. तरुणाई आज जीवाची मुंबई करतील. प्रेम प्रकरणांना आज ग्रीन सिग्नल.

 

मीन – ( शुभ रंग – गुलाबी)
आज तुमचे मनोबल उत्तम असेल आवक पुरेशी राहील. तरीही बचतीला प्राधान्य देणे गरजेचे आहे गृहिणींना माहेरची ओढ लागेल. प्रेमप्रकरणे आज बोअर करतील.

 

 

!! शुभम भवतु!!

 

 

श्री जयंत कुलकर्णी

 

फोन ९६८९१६५४२४

 

 

( ज्योतिषी व वास्तुशास्त्र सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.