Today’s Horoscope 16 May 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 16 May 2023
वार – मंगळवार
16.05.2023
शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.
आज विशेष- साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी 03.00 ते 04.30
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र- उत्तरा भाद्रपदा 8.15 पर्यंत नंतर रेवती
चंद्र राशी – मीन.
—————————————-
मेष  ( शुभ रंग- पांढरा )
आज मीपणा प्रगतीच्या आड येऊ शकतो. गोड बोलून बरीच अवघड कामे सोपी करता येतील. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तातडीने प्रवासास निघावे लागू शकते.

वृषभ (शुभ रंग- सोनेरी )
आज केलेल्या कोणत्याही वाटाघाटी सकारात्मकतेने पार पडतील. जिवलग मित्राकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शेअर्स व्यवहारातील तुमचे अंदाज कार्य ठरतील.

मिथुन ( शुभ रंग- हिरवा )
नोकरीच्या ठिकाणी उच्च अधिकारी वर्गाशी तुमचा सलोखा वाढेल. कामाच्या व्यापात आज कुटुंबीयांसाठी वेळ देणे अवघड होईल. संध्याकाळी मित्रांच्या सहवासात रमाल.

कर्क (शुभ रंग- आकाशी)
घरात वडीलधाऱ्या मंडळींशी काही वैचारिक मतभेद आज होऊ शकतात. परंतु तुम्ही त्यांच्या शब्दाचा मान राखाल. आज काही खोटी आश्वासने देणारे मित्र तुम्हाला भेटतील त्यांना दुरूनच राम राम करा.

सिंह ( शुभ रंग – भगवा)
नवीन व्यावसायिकांनी स्पर्धकांना कमजोर समजू नये. नोकरदारांनी नोकरीच्या ठिकाणी आज नियमांचे पालन काटेकोरपणे करावे. हीत शत्रू टपूनच बसलेले आहेत सतर्क रहा.

कन्या ( शुभ रंग- राखाडी)
व्यवसायात भागीदारांशी सलोख्याचे संबंध असतील. वैवाहिक जीवनातही आज गोडी गुलाबी असून काही जुन्या स्मृती मनाला आनंद देतील. आशादायी दिवस असून काही शुभ समाचार येतील.

तूळ ( शुभ रंग- गुलाबी) – Today’s Horoscope 16 May 2023
नोकरीच्या ठिकाणी विरोधकांच्या काही उचापती चालूच राहतील. आरोग्य विषयक तक्रारींची आज वेळीच दखल घेणे गरजेचे आहे. दुकानदारांची थकलेली उधारी वसूल होईल.

वृश्चिक (शुभ रंग- केशरी)
नोकरदारांना नोकरीत बदल करण्यासाठी योग्य संधी चालून येतील. नवोदित कलाकारांच्या अथक प्रयत्नांना यश येईल. रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळू शकेल.

धनु (शुभ रंग- क्रीम)
जमीन खरेदी विक्रीचे काही व्यवहार मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना कठीण विषयातही गोडी निर्माण होईल. गृहिणींना तर आज अजिबात उसंत मिळणार नाही.

मकर ( शुभ रंग- मोरपंखी )
आजचा दिवस धावपळीचा आहे. तुमचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणारी एखादी घटना घडेल. उच्च अधिकारी असाल तर सह्या करण्यापूर्वी मजकूर नीट वाचून घ्या.

कुंभ (शुभ रंग – पांढरा)
आज तुमची मिळकत उत्तम असेल. गृहिणींना अचानक येणाऱ्या पाहुण्यांची ऊठबस करावी लागेल. आज प्रवास त्रासदायक होऊ शकतो. फार अर्जंट नसेल तर टाळा.

मीन (शुभ रंग – मरून )
महत्त्वाचे निर्णय घेताना पूर्ण विचार करा. अडचणीच्या प्रसंगी आज जोडीदाराने दिलेला सल्ला महत्त्वाचा असेल. कमी श्रमात जास्त लाभाच्या अपेक्षेने आज निराशाच पदरात पडू शकते.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.