Today’s Horoscope 22 December 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 22 December 2022
वार – गुरुवार.
22.12.2022
शुभाशुभ विचार- वर्ज्य दिवस.
आज विशेष- सामान्य दिवस.
राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00
दिशा शूल – दक्षिणेस असेल. आजचे नक्षत्र – ज्येष्ठा.
चंद्र राशी – वृश्चिक.
—————————————-
मेष (शुभ रंग – राखाडी)
कोणतेही नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. व्यवसायात भागीदारांशी मतभेद संभवतात. वैवाहिक जीवनात भांड्याला भांडे लागेल.

वृषभ (शुभ रंग – चंदेरी)
आज तुमचा कामातील उत्साह पाहून तुमचे विरोधकही प्रभावित होतील. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. वैवाहिक जोडीदारा बरोबर आज चांगले सूर जुळतील.

मिथुन (शुभ रंग – हिरवा)
आज तुमची तब्येत थोडी नरमच असेल. काही जुनी दुखणी डोके वर काढण्याची शक्यता आहे. येणी असतील तर अनपेक्षित पणे वसूल होतील. प्रवासात जरा सावध राहा.

कर्क (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
एखाद्या समारंभात तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. एकतर्फी प्रेमाला समोरून होकार मिळेल. कलेच्या क्षेत्रात नवोदीतांना उत्तम संधी चालून येतील.

सिंह (शुभ रंग – क्रीम)
शालेय उपयोगी वस्तूंचे व्यवसाय तेजीत चालतील. कलाकारांना यश सोपे नाही. स्ट्रगल वाढवावी लागणार आहे. गृहिणींना आज अजिबात उसंत मिळणार नाही.

कन्या (शुभ रंग – लाल)
कार्यालयीन कामानिमित्त प्रवास घडतील. बेरोजगारांना नोकरीचे कॉल देतील. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामाला लागा. आज जरा आईच्या तब्येतीची विचारपूस नक्कीच करा.

तूळ (शुभ रंग – पांढरा)
आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रात इतरांना अशक्य असलेले तुम्ही शक्य करून दाखवाल. आज वाणीत गोडवा ठेवून विरोधकांनाही आपलेसे कराल.

वृश्चिक (शुभ रंग – सोनेरी)
कार्यक्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. वरिष्ठांनी सोपवलेल्या वाढीव जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. आज महत्त्वाच्या चर्चेत मात्र इतरांचे म्हणणे ऐकून घ्या.

धनु (शुभ रंग – मोरपंखी)
आज घरात वडीलधाऱ्यांचे मूड सांभाळावे लागणार आहेत. कोणतेही आर्थिक व्यवहार सावधपणे करायला हवेत. दूरच्या प्रवासात बेसावध राहून चालणार नाही.

मकर (शुभ रंग – पिस्ता) Today’s Horoscope 22 December 2022
आज काही मनाजोगत्या घटना घडतील. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. प्रिय मित्र मैत्रिणीच्या सहवासात आजची संध्याकाळ मजेत जाईल.

कुंभ (शुभ रंग – केशरी)
नोकरीच्या ठिकाणी सहकारी तुमच्या मताचा आदरच करतील. अधिकाराचा गैरवापर मात्र टाळायला हवा. कामाच्या व्यापात आज कुटुंबीयांना वेळ देणे अवघड जाईल.

मीन (शुभ रंग – निळा)
नवीन व्यवसायात मर्यादा ओळखून आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. आत्मविश्वासाचा अतिरेक नुकसानास कारणीभूत ठरेल. ज्येष्ठ मंडळींनी उपासनेत खंड पडून देऊ नये.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

Maharashtra : रब्बी हंगामामध्ये ‘प्रधानमंत्री फसल विमा योजने’कडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी फिरवली पाठ?

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.