Today’s Horoscope 27 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 27 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्यआजचे पंचांग

आजचा दिवस- मंगळवार

तारीख – 27. 02.2024.

शुभाशुभ विचार – 13 प. चांगला दिवस.

आज विशेष – साधारण दिवस.

राहू काळ – दुपारी 3.00 ते 04.30 .

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आज नक्षत्र – हस्त.

चंद्र राशी – कन्या.
—————————–
मेष – ( शुभ रंग – मरून)

ध्येयप्राप्तीसाठी तुमचे अथक परिश्रम चालू असून तब्येतीकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. आज तुम्हाला विश्रांतीची गरज भासेल. वैवाहिक जीवनातील वाद फार ताणू नका.

वृषभ – ( शुभ रंग- क्रीम)

उच्च शिक्षण घेणाऱ्यांच्या महत्त्वकांक्षा वाढतील विद्यार्थी पालकांच्या अपेक्षा पूर्ण करतील आज सहकुटुंब एखाद्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल. छान दिवस.

मिथुन – ( शुभ रंग- हिरवा )

आज तुमच्यासाठी गृह सौख्याचा दिवस. कुठेही न जाता घरी आराम करावासा वाटेल. गृहिणी आज घर स्वच्छतेचे मनावरच घेतील. मुलांच्या शिस्तीस आज प्राधान्य द्यायला हवे.

कर्क – ( शुभ रंग – डाळिंबी)

प्रॉपर्टी विषयीचे मोठे आर्थिक व्यवहार आज टाळा. प्रवासात काही नवीन नाती जुळू शकतील. आज काही अति हुशार मंडळी ही संपर्कात येणार आहेत. व्यर्थ वाद टाळावेत.

सिंह -( शुभ रंग – राखाडी)

आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असेल. गोड बोलून विरोधकांनाही आपलेसे कराल. आज नेत्यांची वक्तव्य जनमानसांवर प्रभाव टाकतील. आशादायी दिवस.

कन्या – ( शुभ रंग- जांभळा)

आज कुठेही आपलेच खरे करण्याचा तुमचा प्रयत्न असेल. काही साध्याशा गोष्टींवरून तुम्हाला राग येईल. आज महत्त्वाच्या चर्चेत आपलेच म्हणजे तुम्ही इतरांना मान्य करायला लावाल.

तूळ- ( शुभ रंग- पिस्ता)

बेरोजगारांना घरापासून लांब नोकरीच्या संधी येतील. अधिकारी वर्गाला कार्यालयीन कामासाठी प्रवास करावे लागतील. आज दुकानदारांनी उधारी व उसनवारी टाळावी.

वृश्चिक – ( शुभ रंग – भगवा)

आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून काही दुरावलेली नाती जवळ येतील. काही भाग्यवान मंडळींना नव्या घराचा ताबा मिळेल. तुमची अपुरी स्वप्न साकार होऊ शकतील.

धनु- (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी तुमच्यासाठी कमी महत्त्वाच्या असतील. नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. आज मित्रमंडळींना दोन हात लांबच ठेवा.

मकर-  (शुभ रंग- जांभळा)

आज नोकरीच्या ठिकाणी असलेले नियम तंतोतंत पाळावे लागतील. वरिष्ठांना खुश करण्यासाठी तारेवरची कसरत होईल. मनशांतीसाठी सत्संगा शिवाय दुसरा पर्याय नाही.

कुंभ – (शुभ रंग- मोरपंखी)

सासुरवाडी कडून एखादा लाभ संभवतो. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या मताने घ्या. आज आपल्या मर्यादेत राहिलेले बरे धाडसाची कामे टाळली तर बरे होईल.

मीन – ( शुभ रंग- आकाशी)

भागीदारीच्या व्यवसायातील सौम्य मतभेद सुसंवादाने दूर होतील. वैवाहिक जीवनात काही जुन्या आठवणी मनाला आनंद देतील. आज दूरच्या प्रवासात खोळंबा संभवतो.

श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.