Today’s Horoscope 31 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 31 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – शुक्रवार.

31.03.2023.

शुभाशुभ विचार- शुभ दिवस.

आज विशेष- सामान्य दिवस.

राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र – पुष्य 25.57 पर्यंत नंतर आश्लेषा .

चंद्र राशी – कर्क.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- भगवा )

आनंदी व उत्साही असा दिवस असून सगळी कामे सुरळीत पार पडतील. गृहिणी महागड्या वस्तूंची खरेदी करतील. कला क्रीडा क्षेत्रातील मंडळींना आज प्रयत्नांती परमेश्वर.

वृषभ (शुभ रंग- सोनेरी )

सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धात उरकून घ्या. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करायला हवेत. खोटी आश्वासने देणारे काही लोक भेटतील. सतर्क रहा.

मिथुन ( शुभ रंग- आकाशी )

आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकारल. वाणीत मृदुता ठेवून अनेक किचकट प्रश्न आज तुम्ही सहजच मार्गी लावाल.

कर्क (शुभ रंग- राखाडी.)

महत्त्वाच्या चर्चेत आपली मते आत्मविश्वासाने मांडाल. तरीही अति आत्मविश्वास आज नुकसानास कारणीभूत ठरू शकतो. इतरांचेही ऐकून घेण्याची मानसिकता ठेवा.

सिंह ( शुभ रंग- चंदेरी)

नवीन व्यवसायात आपली कुवत ओळखूनच आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. ज्येष्ठ मंडळींनी पथ्य पाणी काटेकोरपणे पाळावे. आज सत्संगातूनच मन शांती लाभेल.

कन्या ( शुभ रंग- मोरपंखी)

कार्यक्षेत्रात तुमच्या कर्तुत्वाला व नेतृत्वगुणांनाही वाव मिळेल. इतरांस न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या आत्मविश्वासाने स्वीकाराल व त्या पूर्ण कराल. व्यापाऱ्यांची आवक चांगली असेल. आज तुम्ही थोडे हट्टीपणाने वागाल.

तूळ ( शुभ रंग- जांभळा)

नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा. आज कायद्यात राहाल तरच कायद्यात राहाल. वडीलधाऱ्यांची मतेही विचारात घ्यायला हवीत.

वृश्चिक (शुभ रंग- केशरी)

नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. नोकरदारांनी बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्यायला हवे. ज्येष्ठ मंडळींनी प्रवासात आरोग्यास जपावे.

धनु- (शुभ रंग- मरून)

आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. आज तब्येतही थोडी नरमच राहील. जोडीदार जे म्हणेल त्यास होच म्हणणे हिताचे राहील. व्यवसायात भागीदारांच्या मताने घ्या.

मकर ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. अधिकार योग चालून येतील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. आज पत्नीच तुम्हाला योग्य सल्ले देईल.

कुंभ (शुभ रंग – निळा)

ध्येयप्राप्तीसाठी परिश्रम वाढवावे लागतील. जुनी दुखणी अंगावर काढू नका. काही येणी असतील तर मागितल्याने ती मिळतील. गृहिणीसाठी आज अति जास्त दिवस.

मीन -(शुभ रंग – जांभळा )

नोकरदारांना वरिष्ठांच्या लहरी सांभाळाव्या लागतील. नवोदित कलाकारांना प्रसिद्धीची चव चाखता येईल. रुग्णांच्या प्रकृतीत आज लक्षणीय सुधारणा दिसून येईल.

शुभम भवतु 
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क – 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.