Pune : पुणे आज कडकडीत बंद

एमपीसी न्यूज – एरव्ही पुणे शहराच्या कोणत्याही भागांत जाण्यासाठी तासंतास लागतात. कोरोनामुळे मागील काही दिवसांपासून शहरात कमालीची शांतता आहे. आज तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जनता कर्फ्यु’ जाहीर केल्याने पुणेकरांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यानिमित्ताने पुणे शहर, उपनगरांतील नेहमी वर्दळ असलेल्या भागात आज ‘सन्नाटा’ पसरलेला पहायला मिळाला.

पुणे शहरातील सर्वच रस्त्यांवर स्मशान शांतता आहे. इतिहासात प्रथमच असा कडकडीत बंद पुणेकरांनी अनुभवला. यामध्ये पुणेकरांचाही स्वयंस्फूर्तीने पाठिंबा देत सहभाग घेतला आहे. कोरोनाचे रुग्ण पुण्यात वाढत असल्याने नागरिकांनी प्रचंड धसका घेतला आहे. पुढील आणखी काही दिवस पुणेकरांना या महाभयानक संकटाला तोंड द्यावे लागणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

पुणे शहरातील सर्वच दुकाने बंद आहेत. यापूर्वी कधीही एवढी शांतता अनुभवयास मिळाली नव्हती, असे अनेक जेष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे. कोरोनाला संपविण्यासाठी पुणेकरांनी घरातच राहण्याचे आवाहन शासनातर्फे करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.