Tree planting : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त वृक्षारोपण

एमपीसी न्यूज –  देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त सुरु असलेल्या उत्सवाचा एक भाग म्हणून, लष्कराच्या दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा सब एरियाच्या  विद्यमाने तळेगाव येथील ऑर्डनन्स डेपोच्यावतीने सामाजिक वन विभाग, वडगाव मावळ यांच्या सहकार्याने  वृक्षारोपण मोहीम (Tree planting) राबविण्यात  आली.

 

Indian Railway : रेल्वेच्या डब्याचे हॉटेलात रूपांतर, लवकरच पुण्यात होणार सुरू

 

भारतीय लष्कर  नेहमीच आपल्या पर्यावरणीय जबाबदाऱ्या निभावण्यासाठी वचनबद्ध आहे. ऑर्डनन्स डेपो, तळेगाव यांनी 1 जुलै पासून ही  वृक्षारोपण मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेदरम्यान,  चालू पावसाळ्यात  सुमारे 283 एकर क्षेत्रात, स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त विविध जातींची 75 हजार रोपे (Tree planting) लावण्यात येणार आहेत. यामुळे या क्षेत्रात सध्या असलेल्या हिरवळीत भर पडेल. या मोहिमेच्या माध्यमातून जवान, नागरी संरक्षण कर्मचारी,  कुटुंबे आणि मुले एकत्रितपणे  “हिरवीगार पृथ्वी स्वच्छ पृथ्वी ” हा  संदेश देतील.

 

 

हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी महत्वाचा आहे. ही झाडे (Tree planting) भावी पिढ्यांसाठी एकप्रकारची गुंतवणूक आहे, ज्यामुळे मोकळ्या जागांवर नैसर्गिक सावली मिळेल, जमिनीची धूप,  प्रदूषण कमी होईल आणि पर्यावरण संतुलन राखून  त्या क्षेत्राचे हिरवे आच्छादन वाढवेल.

 

ऑर्डनन्स डेपोचे कमांडंट आणि  बी. ए. पोळ,  डीएफओ, एसएफडी यांनी वृक्षारोपण करून या मोहिमेचा आरंभ केला. ही मोहीम पुढील दोन महिने सुरू राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.